शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या कमतरतेमुळे नव्हे;  उपेक्षेमुळे देशातील प्रश्न वाढले!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 06:10 IST

आपल्या देशातील प्रश्न हे संविधानातील कमतरतेमुळे नाहीत, तर संविधानाच्या उपेक्षेमुळे आहेत, असे ठाम प्रतिपादन विविध सामाजिक चळवळींचे अग्रणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी ठाण्यात केले. संविधानाचे महत्त्व पटवून घ्यायचे असेल, तर संविधान नव्हते तेव्हा समाजात कसे जातीयवादी, लिंगवादी, धर्मवादी, व्यक्तिस्वातंत्र्यविरोधी कायदे होते, ते आधी समजून घेतले पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.

ठाणे : आपल्या देशातील प्रश्न हे संविधानातील कमतरतेमुळे नाहीत, तर संविधानाच्या उपेक्षेमुळे आहेत, असे ठाम प्रतिपादन विविध सामाजिक चळवळींचे अग्रणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी ठाण्यात केले. संविधानाचे महत्त्व पटवून घ्यायचे असेल, तर संविधान नव्हते तेव्हा समाजात कसे जातीयवादी, लिंगवादी, धर्मवादी, व्यक्तिस्वातंत्र्यविरोधी कायदे होते, ते आधी समजून घेतले पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.समता विचार प्रसारक संस्था व कोपरी संघर्ष समिती आयोजित सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेमध्ये बोलताना वारे म्हणाले की, संविधानाने भारतातील सर्व जातीधर्मांच्या स्त्रीपुरुषांना सन्मानाची आणि विकासाची हमी दिली आहे. आपले संविधान एक थेंबही रक्त न सांडता झालेली क्रांती आहे. कारण, आपल्या संविधानाने २१ वर्षांवरील सर्व स्त्रीपुरुषांना मतदानाचा अधिकार दिला आहे, ज्यासाठी इंग्लंड, अमेरिकेसारख्या लोकशाहीवादी पुढारलेल्या देशातील स्त्रियांनासुद्धा किती वर्षे लढा द्यावा लागला होता. संविधान न वाचता त्याबद्दल बरेच गैरसमज पसरले आहेत. संविधान ही डोक्यावर घेऊन मिरवण्याची गोष्ट नाही, तर ती डोक्यात घेऊन समजण्याची गोष्ट आहे. संविधानात फक्त राखीव जागा नाहीत, तर अजूनही बरेच काही आहे. शेतकºयांच्या मालाला भाव कसा मिळेल आणि त्यांच्या आत्महत्या कशा थांबतील, याचे उत्तरही संविधानाच्या योग्य अंमलबजावणीत आहे. संविधानाचे कायदे गरिबांच्या बाजूचे आहे, म्हणून गरीब खूश आहेत आणि त्याच कायद्यांची अंमलबजावणी होत नाही, म्हणून श्रीमंत खूश आहेत. आज संविधान बदलण्याची भाषा चालते आहे, कायद्याने संविधान बदलू शकता, पण त्यातील मूलभूत अधिकारांची मुख्य चौकट कुणीही बदलू शकत नाही. पण, असे असले तरीही फक्त संसद, फक्त कायदा, फक्त न्यायालय नागरिकांना मूलभूत अधिकाराची हमी देऊ शकत नाही. ती हमी फक्त नागरिकांची सामूहिक सद्सद्विवेक बुद्धीच देऊ शकते. म्हणून, संविधान अभ्यासून, समजून घेतले पाहिजे. संविधान फक्त घराबाहेरील समाजासाठी  नाही, तर घरासाठीही संविधान लागू आहे, असे मत त्यांनी मांडले.  अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ म्हणाले की, आज संविधानवादी समाज निर्माण करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे. यावेळी अध्यक्षस्थानी कोपरी संघर्ष समितीचे विनोद मोरे होते. संस्थेचे सहखजिनदार सुनील दिवेकर यांनी प्रस्तावना, तर समितीचे राजेश गाडे यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणे