शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

'अहिंसा, शांततामय आंदोलनाचा मार्ग कदापि सोडणार नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:29 IST

भिवंडी, मुंब्य्रातील आंदोलकांची ग्वाही; दंगे घडवल्याची भावना

- नितीन पंडित/ कुमार बडदे भिवंडी/मुंब्रा : तीन दिवसांमध्ये दिल्लीत घडलेल्या घटनांमुळे अस्वस्थता आहे. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याबाबत हुरहुर आहे. मात्र, येथील आंदोलनातील शांतता ढळू द्यायची नाही आणि कुणी कितीही चिथावणी दिली तरी तोल ढळू द्यायचा नाही, यावर भिवंडीतील मिल्लतनगर आणि मुंब्रा येथील अग्निशमन केंद्रापाशी आंदोलनास बसलेल्या आंदोलकांचा निर्धार पक्का आहे.मुंब्य्रातील आंदोलनस्थळी दिल्लीतील हिंसाचाराच्या बातम्या पोहोचल्यावर दिल्ली पोलीस तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या असल्या, तरी आंदोलन अहिंसेच्याच मार्गाने सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलक महिलांनी व्यक्त केला. दोन महिन्यांपासून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागायला नको होते, असे मत आंदोलक महिलांनी व्यक्त केले. दिल्लीतील शाहीनबागच्या धर्तीवर मुंब्रा येथे ३९ दिवसांपासून एनआरसी, सीएए, एनपीआरविरोधात महिलांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील प्रमुख वक्त्यांपैकी एक रेहाना शेख म्हणाल्या की, दिल्लीत आंदोलनाला हिंसक वळण लागणार याची कुणकुण लागली होती. दिल्लीतील घटनांमुळे येथील आंदोलक विचलित झाले नसून, या घटना कोणी घडवून आणल्या, याची माहिती सर्वांना आहे, असे शेख म्हणाल्या. क्रि येवर प्रतिक्रि या व्यक्त न करता सत्य आणि अहिंसेच्या मार्गानेच उत्तर देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंब्रा येथे सर्वधर्मीय नागरिक एकोप्याने राहतात. अनेक कठीण प्रसंगांमध्ये एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतात. यापुढेही आम्ही सारे असेच एकोप्याने राहू, अशी ग्वाही आंदोलनात काही दिवस सहभागी झालेल्या संगीता पालेकर यांनी दिली.मुंब्य्रातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी ‘लोकमत’ला दिली.संवेदनशील भिवंडी शहरात २७ दिवस सुरू असलेल्या आंदोलनात एकात्मतेची प्रचीती आली व दिल्लीतील घटनांनंतरही ते चित्र बदलणार नाही, अशी ग्वाही आंदोलक व अन्य नागरिकांनी दिली. सीएएच्या विरोधात भिवंडीत अनेक आंदोलने झाली. मात्र, शांततामय वातावरण कायम राहिले.भिवंडीसारख्या संवेदनशील शहरात हे आंदोलन इतक्या दीर्घकाळ शांततेत सुरू राहण्यामागे पोलिसांचा वाढत जनसंपर्क आणि पोलीस प्रशासनाने केलेले नियोजन हेच कारण असल्याचे दोन्हीकडील लोकांचे म्हणणे आहे. भिवंडीत १९८४ च्या दंगलीनंतर जी शांतता आहे, ती आजपर्यंत कायम आहे.दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतले असले, तरी भिवंडीत तशी परिस्थिती आम्ही येऊ देणार नाही. जर कुणी भडकावू प्रतिक्रि या देत असेल, तर अशांवर पोलिसांनी थेट कारवाई केली तरी हरकत नाही. शहरातील शांतता, अखंडता अबाधित राहिली पाहिजे, अशी प्रतिक्रि या इम्रानअली सय्यद यांनी दिली.आंदोलनामुळे सर्व समाजांतील नागरिकांमध्ये सध्या बंधुभावाचे नाते निर्माण झाले आहे. भिवंडीतील सर्व जाती-धर्मांचे लोक एकमेकांचा आदर करीत असून शहरात अखंड शांतता नांदेल, असे मत किरण चन्ने यांनी व्यक्त केले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकdelhi violenceदिल्ली