शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे नसलेल्या मिशीला तूप; राणे भडकले

By admin | Updated: January 29, 2017 03:24 IST

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये वितुष्ट निर्माण करणाऱ्या आठ जागांपैकी पाच जागांवर काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याचे स्पष्ट झाल्याने या आघाडीकरिता आग्रही

- पंकज रोडेकर,  ठाणेकाँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये वितुष्ट निर्माण करणाऱ्या आठ जागांपैकी पाच जागांवर काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याचे स्पष्ट झाल्याने या आघाडीकरिता आग्रही असलेल्या नारायण राणे यांनी ठाण्यातील काँग्रेस नेत्यांची हजेरी घेतल्याचे समजते. नसलेल्या मिशीला तूप लावून फिरणाऱ्या नेत्यांना घरचा आहेर मिळाल्यावर आता काही जागांची अदलाबदल करून आघाडी मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.ठाण्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली, अशी घोषणा २१ जानेवारी रोजी राणे हे करून बसले असल्याने आता आघाडी करणे, हा राणे यांच्याकरिता प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे. मात्र, ज्या दिवशी राणे यांनी आघाडीची घोषणा केली, त्याच दिवशी झालेल्या बैठकीत आठ जागांवरून ठाण्यातील काँग्रेसचे नेते मनोज शिंदे व राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्यात बाचाबाची झाली होती. काँग्रेसने मुंब्रा, गोकूळनगर, घोडबंदर, बाळकुम, वागळे आदी जागांवर दावा केला होता. तिढा सुटत नसल्याने राणे यांनी ठाण्यात येऊन या आठ जागांकरिता इच्छुकांसोबत चर्चा केली. या सर्व जागांवर एकही तगडा उमेदवार काँग्रेसकडे नसल्याची किंबहुना पाच जागांवर पक्षाकडे उमेदवारच नसल्याची माहिती राणे यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे संतापलेल्या राणे यांनी स्थानिक नेत्यांना चांगलेच फैलावर घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर, आता राष्ट्रवादीने देऊ केलेल्या काही जागांऐवजी काही जागांची अदलाबदल करण्याबाबत वाटाघाटी सुरू झाल्या असून अशा जागांची संख्या सात ते आठच्या आसपास आहे. शुक्रवारी रात्री राष्ट्रवादीच्या कार्यालयात यासंदर्भात बैठक झाली आहे. या बैठकीत तीन ते चार जागांवर तोडगा निघाल्याचा दावा करण्यात येत असून उर्वरित जागांचा फैसला दोन दिवसांत होऊन आघाडीची घोषणा फलद्रुप होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.