शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दहीहांडी उत्सवात ध्वनी प्रदुषणाचाही कल्ला; आवाजाची मर्यादा ८० डेसीबलच्या पार

By अजित मांडके | Updated: August 22, 2022 15:53 IST

दहीहंडी आयोजकांच्या या मनमानीपणा विरोधात पोलिस प्रशासन काय भूमिका घेते या कडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असतांना पोलिसांनी एकही गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्तयल्याच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

अजित मांडके 

ठाणे - कोरोनामुळे मागील दोन वर्षे उत्सवावर विरजन पडले होते. परंतु यंदा दहीहांडीचा कल्ला झाला तसाच ध्वनी प्रदुषणाचाही कल्ला झाल्याची माहिती पुढे आली. दहीहांडीच्या दिवशी प्रत्येक महत्वाच्या दहीहांडीच्या ठिकाणी आवाजाची मर्यादा पार झाल्याचे दिसून आले. शहरातील अनेक ठिकाणी या दिवशी आवाजाची पातळी ८० डेसीबलच्या पार गेल्याचे दिसून आले. पोलीस पथकाकडून ही नोंद करण्यात आली आहे.  

सर्वोच्च न्यालयाच्या आदेशाप्रमाणे नागरी वस्तीत साउंड सिस्टीमचा ६५ डेसिबल पेक्षा अधिक आवाज असू नये असे आदेश असतांना ठाण्यातील सर्वच प्रमुख दहीहंडी आयोजकांनी या आदेशाचे शनिवारी उल्लंघन केले. पोलिसांनी दहीहंडी आयोजकांना नियम पाळण्याच्या सक्त पूर्वसूचना दिलेल्या असतांनाही दहीहंडी मंडळांनी पोलिसांना न जुमानता साउंड सिस्टीमचा आवाज वाढवला.

दहीहंडी आयोजकांच्या या मनमानीपणा विरोधात पोलिस प्रशासन काय भूमिका घेते या कडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असतांना पोलिसांनी एकही गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्तयल्याच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली. ठाण्यातील बहुतांशी दहीहंड्या या राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या होत्या. त्यात भाजपच्या स्वामी प्रतिष्ठानने आयोजित केलेली हिरानंदानी मेडोज येथील हंडीहंडीसह, भगवती शाळेच्या मैदानावर आयोजित मनसेची हंडी, आमदार प्रताप सरनाईक यांची संस्कृती प्रतिष्ठानची हंडी, खासदार राजन विचारे यांची जांभळी नाक्यावरील हंडी, रघुनाथ नगर येथील आमदार रवींद्र फाटक यांची हंडी आणि टेम्भीनाका येथील हंडी आदींचा समावेश होतो. या सर्वच प्रमुख दहीहंडी आयोजकांनी उत्सवावेळी ऑर्केस्ट्रा आणि डीजेचा आवाज घुमवला होता. दरम्यान, ऑर्केस्ट्राचा आवाज ६० ते ७० डेसीबल इतका नोंदवण्यात आला तर ज्या ठिकाणी डीजे होता अशा ठिकाणी आवाज ८० ते ८५ डेसीबलच्या घरात होता अशी माहिती सूत्रांनी दिली. तर आवाज मर्यादेचा भंग करणाऱ्या मंडळाविरुद्ध अद्याप एकही एफआयआर दाखल करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी