शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ओसीसाठी हवी वृक्ष प्राधिकरणाची एनओसी; विकासकांच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:43 IST

ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील विकासकांना आता शहर विभागातून ओसी मिळविण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाची नाही, तर वृक्ष प्राधिकरण समितीची एनओसी घ्यावी लागणार आहे. त्या स्वरूपाचा निर्णय मंगळवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यापूर्वी वृक्ष प्राधिकरण विभागाकडून या एनओसी दिल्या जात होत्या. परंतु, यापुढे आता त्या समितीकडून दिल्या जातील, असे या बैठकीत प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे वाटेल तशी वृक्षतोड करणाऱ्या विकासकांच्या मनमानीला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिका हद्दीत विविध प्रकारची मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत, त्यासाठी अनेक वृक्षांची तोड केली जाते. मात्र, तोडलेल्या वृक्षानंतर त्याठिकाणी किती वृक्षांचे पुनर्रोपण केले आहे, याची नेमकी माहिती वृक्ष प्राधिकरण विभागाकडे उपलब्ध नसते. असे असले तरी या विभागाकडून विकासकाला ओसी मिळण्यासाठी एनओसी दिली जाते. मात्र, काही वर्षांपूर्वी न्यायालयानेदेखील पुण्यातील एका प्रकरणात शहर विकास विभागाने ओसी देण्यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीची एनओसी घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले असल्याची माहिती वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य विक्रांत तावडे यांनी दिली.

मागील बैठकीतही त्यांनी हे प्रशासनाच्या निदर्शनास आणले होते. मात्र, त्यावर योग्य असा निर्णय झाला नव्हता. यामुळे मंगळवारी झालेल्या बैठकीत पुन्हा त्यांनी या मुद्याला हात घातला. वास्तविक पाहता विकासकांना वृक्षतोडीची परवानगी दिल्यानंतर, त्यांनी नियमानुसार किती वृक्षांचे पुनर्रोपण केले आहे, याची माहिती घेणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार, ओसी देण्यापूर्वी ते प्रकरण समितीपुढे यावे, अशी मागणीही त्यांनी केली. कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्यानुसार निर्णय घ्यावा, असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. यानंतर, प्रशासनानेदेखील यापुढे ओसी देण्यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीची एनओसी घेतली जाईल, असे स्पष्ट केले.समिती पाहणी करूनच देणार एनओसीआता या समितीच्या माध्यमातून अशी प्रकरणे एनओसीसाठी आल्यास त्यानुसार संबंधित विकासकाने नियमानुसार वृक्षतोडीच्या बदल्यात वृक्षांचे पुनर्रोपण केले आहे अथवा नाही, याची पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार, त्याचा अहवाल तयार करून एनओसी द्यायची किंवा नाही, याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका