शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तक वाचून कोणी अभिनय शिकत नाही : जयंत सावरकर यांनी मांडले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 16:35 IST

ब्ल्यू एंटरटेनमेंट व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयवतीने चौथा माय ठाणे शॉर्ट फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपुस्तक वाचून कोणी अभिनय शिकत नाही : जयंत सावरकर चौथा माय ठाणे शॉर्ट फिल्म फेस्टिवलब्ल्यू एंटरटेनमेंट व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आयोजित फेस्टिवल

ठाणे: पुस्तक वाचून कोणी अभिनय शिकत नाही. काळानुसार आता शॉर्ट फिल्म्सच्या तंत्रज्ञानातही बदल झाला आहे. दुसऱ्यांचे काम बघून आपल्याला शिकता येते. मला काय शिकायला मिळेल याचा मी विचार करतो अशा भावना ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांनी व्यक्त केल्या.ब्ल्यू एंटरटेनमेंट व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आयोजित चौथा माय ठाणे शॉर्ट फिल्म फेस्टीव्हलचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या पी. सावळाराम सभागृहात शनिवारी सकाळी पार पडले. आमच्या काळात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा असत. त्यात भाग घेता यावा यासाठी मी तीन वेळा महाविद्यालये बदलली. परंतू या भानगडीत मला ना पदवी घेता आली ना काही करता आले. मग मी या क्षेत्रात स्वतंत्र उमेदवारी सुरू केली. आता काळ बदलला आहे, अशा गोष्टींना महाविद्यालयातून प्रोत्साहन दिले जात आहे. फिल्म मेकिंगसारखे वेगवेगळे कोर्सेस महाविद्यालयात सुरू झाले आहे. अशा प्रकारांचे मार्गदर्शन आमच्या काळात असते तर मी आणखीन काही घडलो असतो. मूळात सिनेमा असो की नाटक यात मी पोट भरण्यासाठी काम केले. मी आधी पडद्यामागे काम करीत होतो, मग अपघाताने नट म्हणून उभा राहीलो. नट झाले म्हणून या कार्यक्रमाला मला आमंत्रित करण्यात आले. शॉर्ट फिल्म्सचा अभ्यास करु पाहू इच्छिणाºया तरुणांबरोबर मी दोन वर्षांपुर्वी स्वच्छता अभियानाची शॉर्ट फिल्म केली. तरुण मुलांबरोबर काम करण्याचा अनुभव वेगळा होता. यावरुन त्यांची आणि आमच्या विचारसरणीतला फरक समजला. माझे सौभाग्य की तरुण मंडळींसोबत मला काम करायला मिळत आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे, मानसी प्रधान, महाविद्यालयाचे खजिनदार सतिश सेठ, सचिन मोरे उपस्थित होते. ब्ल्यू एंटरटेनमेंटचे एकनाथ पोवळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

टॅग्स :thaneठाणेTheatreनाटकMumbaiमुंबई