शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

एका रात्रीत कुणी नेता होत नाही - राजन विचारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 06:45 IST

तुम्ही तुमच्या औकातीत राहा,असा इशाराही त्यांनी दिला.

ठाणे : व्हिडीओ बाइट देऊन एका रात्रीत कुणी नेता होत नाही, अशा शब्दांत शिवसेना खा. राजन विचारे यांनी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर टीकास्र सोडले. उचलून नेण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ. तुम्ही तुमच्या औकातीत राहा,असा इशाराही त्यांनी दिला. जाधव यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे शिवसेनेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मात्र, स्वत: शिंदे यांनी जाधव यांना फार महत्त्व न देण्याची भूमिका घेतली आहे.जाधव यांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. त्यावेळी त्यांनी वसंत डावखरे, गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे या मंडळींचे राजकारण आता संपले असल्याची टीका केली होती. शहरात शिवसेना विरुद्ध मनसे असे बॅनर वॉर रंगले होते. आता या वादात विचारे यांनी उडी घेतली असून जाधव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. प्रत्येक जण कर्तृत्वाने मोठा होत असतो, असा टोला त्यांनी जाधव यांना लगावला. डावखरे यांनी कितीतरी वर्षे काम केले. डावखरे आमदार आणि सभापती झाले. पालकमंत्री शिंदे हे देखील शाखाप्रमुख होते. पुढे नगरसेवक, सभागृह नेते, आमदार झाले. त्यानंतर मंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते झाले. एवढी सर्व पदे मागील २५ ते ३० वर्षे त्यांनी ठाणे शहरात काम करीत असताना भूषवली आहेत, असे विचारे म्हणाले.महामारीच्या काळात, शिंदे हे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोविड हॉस्पिटलमध्येही जात होते. पण आपण केवळ त्या कम्पाउंड वॉलच्या बाहेर उभे राहून बाइट देत होतो, अशी टीका विचारे यांनी केली. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलो आहोत, त्यामुळे पोकळ धमक्या आम्हाला देऊ नका, असेही ते म्हणाले.