शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या कोट्यातून मराठा आरक्षण नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 00:43 IST

कुणबी सेनेचा तीव्र विरोध : रस्त्यावर उतरून लढाई लढण्याचा इशारा

वाडा : सध्या महाराष्ट्रात शासकीय, राजकीय व सामाजिक पटलावर मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत आहे. मराठा समाजाला सरकारने १२ टक्के आरक्षण देऊ केले आहे. हे आरक्षण ओबीसी आरक्षणातून सरकार देत असेल, तर त्याला आमचा विरोध आहे. त्याविरोधात राज्यभर रस्त्यावर उतरून आरक्षणाचा वणवा पेटवू, असा सज्जड इशारा कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी बुधवारी वाडा येथे पत्रकार परिषदेत दिला.

राज्यात कोकण, विदर्भ, मराठवाडा व खानदेश या प्रदेशांत कुणबी समाजाची सुमारे ३५ टक्के लोकसंख्या आहे. हा समाज अतिशय तुटपुंज्या शेतीवर गुजराण करीत आहे. नोकऱ्यांचा अभाव व तुटपुंजी शेती यामुळे कर्जबाजारी झाला आहे. ओबीसीवर्गात सुमारे ३५० जातींचा समावेश केला आहे. वर्षानुवर्षे झालेल्या अन्यायामुळे बाराबलुतेदार वर्गात मोडणाºया सर्व जातींमध्ये असंतोषाची भावना असताना मराठा समाजाचा समावेश ओबीसीवर्गात केल्याने अधिक मागास असलेल्या जातींवर अन्याय होणार असल्याचे पत्रकार परिषदेत पाटील यांनी सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख प्रल्हाद शिंदे, नेते आत्माराम भोईर, नितीन पाटील, सतीश पष्टे, राजन नाईक, प्रदीप हरड आदी पदाधिकारी उपस्थित होते.ओबीसी समाज देशोधडीला!पेसा कायद्यावर ते म्हणाले की, महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रात पेसा कायद्यामुळे आदिवासींसाठी १०० टक्के आरक्षण घोषित केल्याने त्याचा जबर फटका ठाणे, पालघर, धुळे, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यांतील ओबीसी समाजाला बसला आहे. त्यातच आता मराठा आरक्षण दिल्याने ओबीसी समाज पुरता देशोधडीला लागणार आहे. १९३९ नंतर जातनिहाय जनगणना जाहीर झालेली नसताना मराठा समाजाला १२ टक्के आरक्षण दिले कुठून? त्यासाठी कोणते निकष लावले, हे सरकारने जाहीर करावे, असा सवालही त्यांनी सरकारला केला. बाराबलुतेदार संघटनांना एकत्र करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

टॅग्स :thaneठाणेmarathaमराठाOBCअन्य मागासवर्गीय जाती