शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘सीबीटीसी’ला निधी देणार नाही!, २० हजार कोटींचा खर्च अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 02:33 IST

लोकलच्या वेळापत्रकात आमूलाग्र बदल घडवून चाकरमान्यांची लेटमार्कपासून सुटका करण्यासाठी मैलाचा दगड ठरणा-या कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) या सुमारे २० हजार कोटी खर्चाच्या प्रकल्पास अपेक्षेप्रमाणे निधी देण्यास मुंबईसह नवी मुंबई महापालिकेने तीव्र विरोध दर्शविला आहे.

- नारायण जाधव ठाणे : लोकलच्या वेळापत्रकात आमूलाग्र बदल घडवून चाकरमान्यांची लेटमार्कपासून सुटका करण्यासाठी मैलाचा दगड ठरणा-या कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) या सुमारे २० हजार कोटी खर्चाच्या प्रकल्पास अपेक्षेप्रमाणे निधी देण्यास मुंबईसह नवी मुंबई महापालिकेने तीव्र विरोध दर्शविला आहे.महाराष्ट्र शासनाने जरी हा निधी देण्याचे निर्देश महापालिकांसह सिडको आणि एमएमआरडीएला दिले असले, तरी आम्ही रेल्वेला निधी का म्हणून द्यायचा, त्यात आमचा काय फायदा, असा प्रश्नमुंबई आणि नवी मुंबई महापालिकेच्या महापौरांनी उपस्थित केला आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीए, सिडको, मुंबई महापालिकेने प्रत्येकी १५ टक्के, तर नवी मुंबई महापालिकेने पाच टक्के खर्च उचलावा, असा निर्णय राज्याच्या नगरविकास विभागाने घेतला आहे. या संस्थांनी अर्थसंकल्पीय तरतूद करून प्रशासकीय मंजुरी घेऊन तो निधी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे सुपुर्द करावा, असे आदेश ९ मार्चला शासनाने दिले आहेत.>रेल्वेची सीबीटीसी ही योजना नेमकी काय आहे हे मुळात मुंबई महापालिकेतील अनेक लोकप्रतिनिधींना माहीत नाही. त्यातच रेल्वेच्या प्रकल्पाला महापालिकेने काय म्हणून निधी द्यावा? तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. शिवाय यंदाचा अर्थसंकल्प तयार झाला आहे. पुढील कोणत्याही अर्थसंकल्पात त्यासाठीची तरतूद करण्यास मुंबई महापालिका विरोध करेल.- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई महापालिकारेल्वे प्रकल्पांसाठी महापालिकांनी निधी द्यावा, असा आदेश काढणेच चुकीचे आहे. अशा प्रकल्पासाठी पालिकांवर अवलंबून राहणे हास्यास्पद आहे. आम्ही सीबीटीसी प्रकल्पास निधी देणार नाही. आयुक्तांनी जरी शासन आदेशानुसार तसा प्रस्ताव आणला, तरी त्यास तीव्र विरोध केला जाईल. - जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई महापालिका>...मग ग्रामपंचायतींकडे भीक मागणार का?कर्जत-कसारा स्थानकांपर्यंत सीबीटीसी प्रकल्पाचा विस्तार होणार आहे. मग तेथील ग्रामपंचायतींकडे या प्रकल्पांसाठी भीक मागणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.