शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
2
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
3
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
6
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
7
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
8
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
9
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
10
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
11
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
12
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
13
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
14
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
15
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
17
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
18
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
19
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
20
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार

ना कॉल, ना ओटीपी, तरी बँकेतून पैसे गायब! फ्री गेम, अनोळखी अ‍ॅप परमीशन देताना काळजी घ्या....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ना कॉल केला, ना ओटीपी दिला, तरी आपल्या बँक खात्यातून ऑनलाईन पैसे गायब होण्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ना कॉल केला, ना ओटीपी दिला, तरी आपल्या बँक खात्यातून ऑनलाईन पैसे गायब होण्याचे अनेक प्रकार सध्या पाहायला मिळतात. परंतु, ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन ठाणे शहर पोलिसांच्या सायबर विभागाने केले आहे. गेल्या अडीच वर्षांत अशा फसवणुकीच्या ६५२ तक्रारी आल्या असून, त्याद्वारे ८० लाखांची फसवणूक झाली. त्यातील ३५ लाखांची रक्कम परत मिळविण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे.

कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन व्यवहारांना खूप महत्त्व प्राप्त झाले. प्रवासाची तिकीट खरेदी, हॉटेलमधील बिल अगदी पेट्रोल पंपावरही ऑनलाईन व्यवहार झाले. याचाच फायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला. अगदी अलीकडे ठाण्यातील तीनहातनाका येथे एका तरुणाने पेट्रोलचे पैसे कार्ड स्वॅप करून भरले. परंतु, कालांतराने त्याच्या खात्यातून काही हजारांची रक्कम गेल्याचे आढळले. या प्रकरणात नौपाडा पोलिसांनी गुजरातमधून दोघांना अटक केली होती. एटीएम कार्डचा पासवर्ड माहिती केल्यानंतर पेट्रोलपंपावरील एका कर्मचाऱ्याने तो क्रमांक लक्षात ठेवून दुसऱ्याच कार्डद्वारे गुजरातच्या साथीदारांच्या मदतीने पैसे काढले होते. या प्रकरणात संबंधिताने कोणालाही ओटीपी दिला नाही की, त्याला कोणाचा कॉलही आला नाही. तरी पैसे मात्र गेले होते. अशाच एका प्रकरणात हॉटेल वेटरलाही पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे असे व्यवहार करताना आणि अनोळखी अ‍ॅप डाऊनलोड करताना खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

* लाखो रुपयांची फसवणूक

वर्षाला साधारण २० ते २५ लाखांची लूट या ऑनलाईनच्या माध्यमातून होते. गेल्या अडीच वर्षांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात सुमारे ८० लाखांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे.

* ३५ लाख ६८ हजारांची रक्कम मिळाली परत -

अशा फसवणुकीच्या प्रकरणात पैसे परत मिळविण्यासाठी पोलिसांच्या सायबर शाखेला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. फसवणूक करणाऱ्याने पेटीएम किंवा मोबीक्विकसारख्या अ‍ॅपद्वारे पैसे घेतले किंवा ज्या बँक खात्यावर ते घेतले, तिथून त्याने ते काढले तर ते मिळविण्यात अनेक अडचणी असतात. पण पेटीएम किंवा मोबीक्विकमधून ते काढले गेले नाही तर या अ‍ॅप तसेच संबंधित बँकेला पत्र देऊन हे पैसे परत मिळविता येतात. ठाणे शहर पोलिसांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये ३५ लाख ६८ हजार ११३ इतकी रक्कम तक्रारदारांना परत मिळवून दिल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

* अनोळखी अ‍ॅप नकोच -

अशाप्रकारे ऑनलाईनद्वारे होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीने बँक किंवा कंपनीचे अ‍ॅप्लिकेशन असल्याचे सांगून टीम व्हूवर, एनीडेस्क किंवा क्विक सपोर्टसारखे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितल्यास आर्थिक फसवणुकीची शक्यता अधिक असते. त्यामुळे असे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करू नये, असा सल्ला सायबर सेलच्या पोलीस उपनिरीक्षक स्रेहल अडसुळे यांनी दिला. कोणत्याही अ‍ॅपला मोबाईलमध्ये परवानगी देताना त्यांच्या अटी काय आहेत, हे वाचावे. कोणतेही अ‍ॅप अनइन्स्टॉल करताना, अ‍ॅप इन्स्टॉल करताना दिलेल्या परमिशन डिनाईड करून मगच अ‍ॅप अनइन्स्टॉल करावे. शक्यतो, अनोळखी व्यक्ती ऑनलाईन गेम खेळू नका.

.........................

‘ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बाळगावी. तसेच मुलांना गेम खेळायची गरज असेल, तर त्यांना दुसरा मोबाईल तसेच ई-मेल आयडी द्यावा. गेम खेळताना अनोळखी प्लेअरला आपल्या वैयक्तिक व बँकेच्या डिटेल्स देऊ नयेत.’

सरदार पाटील, सहायक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर

* ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे

२०१९ -२९९

२०२० -२८६

२०२१ मेपर्यंत -६७