शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील संच्युरी कंपनीत नायट्रोजन टँकरचा स्फोट, २ जणांचा मृत्यू, दोघे गायब तर ६ जण जखमी 

By सदानंद नाईक | Updated: September 23, 2023 16:59 IST

कॅम्प नं-१ शहाड गावठाण येथील संच्युरी रेयॉन कंपनीत सकाळी सव्वा अकरा वाजता नायट्रोजन गॅस टँकरचा स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू तर २ जण गायब झाले.

उल्हासनगर : कॅम्प नं-१ शहाड गावठाण येथील संच्युरी रेयॉन कंपनीत सकाळी सव्वा अकरा वाजता नायट्रोजन गॅस टँकरचा स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू तर २ जण गायब झाले. तर ६ जण जखमी झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी दिली आहे.  स्फोट झालेल्या टँकर ठिकाणी मानवी मासांचा सडा पडल्याचे भयानक चित्र होते. 

उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड गावठाण परिसरात संच्युरी कंपनीतील एका प्लॅन्ट मध्ये सकाळी सव्वा अकरा वाजता गुजरात येथून आलेला नायट्रोजन गॅसचा टीएच-०४, जीएस-२४८७ क्रमांकाचा टँकर हा कंपनी प्लँट मधील कार्बनडाय सल्फर मध्ये भरण्यात येत होता. त्यावेळी मोठा स्फोट झाला. स्फोट एवढा जबरदस्त होता की, संपूर्ण परिसर हादरला गेला. स्फोटात टँकर वरील चालक पवन यादव व प्लॅन्ट येथील हेल्पर अनंत डिंगोरे हे मिसिंग दाखविण्यात आले. तर शैलेश यादव व राजेश श्रीवास्तव या दोघांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात स्फोट झालेल्या टँकर ठिकाणी मानवी मासांचा सडा पडल्याने, मिसिंग दाखविण्यात आलेल्या दोघांचा मृतदेह यामध्ये असावा. असा संशय व्यक्त होत आहे. स्फोट झालेल्या टँकर शेजारी युरेका कंपनीचा टँकर वाहनचालक पंडित लक्ष्मण मोरे व क्लिनर हंसराज चरोत यांच्यासह संच्युरी कंपनीचे सागर झालटे, अमित भरनुके, प्रकाश अनंत निकम व मोहम्मद अरमान असे सहा जण जखमी झाले आहेत.

 पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी संच्युरी कंपनीतील स्फोटातील मृत्यू व जखमी बाबत प्रसिद्धीपत्रक काढले आहेत. तर संच्युरी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी कंपनीच्या स्फोटात दोघांचा मृत्यू तर २ जण मिसिंग दाखविले असून ६ जण जखमी असल्याचे म्हटले आहे. तसेच मृत्यू झालेल्याच्या कामगारांना तर जखमी कामगारांना मदत देणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले. टँकर स्फोटाची चौकशी करण्यात येणार असल्याचेही ललका यांनी म्हटले. आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पु कलानी यांच्यासह भाजपचे शहाराध्यक्ष प्रदीप रामचंदानी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, नाना बागुल यांच्यासह स्थानिक नेत्यांनी जखमींची चौकशी केली.  कामगार नातेवाईक व नागरिकांची गर्दी कंपनीत स्फोट झाल्याची माहिती कामगारांच्या नातेवाईकाला मिळाली. तेंव्हा त्यांनी व स्थानिक नागरिकांनी कंपनी प्रवेशद्वार व रुग्णालयात गर्दीकेली होती.

टॅग्स :thaneठाणेDeathमृत्यू