शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या जलवाहतुकीसाठी तीन आठवड्यात केंद्राशी करार करण्याच्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या पालिकेला सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 19:07 IST

ठाण्याच्या जलवाहतुकीसंदर्भात आणखी एक पाऊल पडले असून, येत्या तीन आठवड्यात या प्रकल्पाबाबत केंद्राशी करार करण्याच्या सुचना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ठाणे महापालिकेला दिल्या आहेत.

ठळक मुद्देपहिल्या टप्यात ठाणे ठाणे -वसई-कल्याण मार्ग होणार सुरुपाण्यावर चालणाऱ्या अँफिबियस बसचाही वापर करण्याची सूचना

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाला गती मिळणार असून सोमवारी केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलेल्या योजनेच्या सादरीकरणानंतर महापालिकेने तीन आठवड्यात या प्रकल्पाबाबत केंद्राशी करार करण्याच्या सूचना गडकरी यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या. तर जलवाहतुकीसाठी बोटींबरोबर जमीन तसेच पाण्यावर चालणाऱ्या अ‍ॅफीबियस बसचाही वापर करण्याची सुचना गडकरी यांनी यावेळी दिल्या.               या बैठकीस खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत जलवाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अंतर्गत जलवाहतूक या महत्वाकांक्षी प्रकल्पातंर्गत ठाणे-वसई-कल्याण, ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते नवी मुंबई या मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यासंर्दभातील तपशीलवार प्रकल्प अहवाल तज्ज्ञ सल्लागार मे. मेडुला सॉप्ट टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यासंदर्भातील सादरीकरण महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी वाहतूक भवनात गडकरी यांच्यासमोर सादर केले. यावेळी या प्रकल्पाच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करूनगडकरी यांनी ठाणे महानगरपालिकेने तीन आठवड्यात केंद्र सरकारच्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प विभागाशी सामंजस्य करार करावा जेणेकरून या प्रकल्पासाठी लागणाºया निधीचे वितरण करणे सुलभ होईल असे सांगितले. तसेच या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी आयआयटी, चेन्नई, जेएनपीटी, बीपीटी आणि कोचीन शीपयार्ड या संस्थांशीही समन्वय साधण्याच्या सूचना देतानाच या प्रकल्पातंर्गत जागतिक दर्जाच्या सुविधा आणि तंत्रज्ञान पुरविण्याबाबत त्यांनी महापालिकेस आश्वासन दिले. हा प्रकल्प यशस्वीपणे चालावा यासाठी प्रकल्पाच्या दुरूस्तीचे आणि निगा व देखभालसाठी प्रकल्प परिसरातच अत्याधुनिक केंद्र उभारण्याच्या सूचना देतानाच या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील नागरिकांना कमी वेळात प्रदुषणविरहित जागतिक दर्जाची सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.               दरम्यान हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ही सेवा वसई-ठाणे-कल्याण या मार्गावर सुरू करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त होणार आहे. या प्रकल्पातंर्गत चालविण्यात येणाऱ्या  बोटी या सीएनजी आणि मिथेनॉलवर चालणाऱ्या  असल्याने ही वाहतूक प्रदुषणविरहित असणार आहे. तसेच कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीसाठी बोटींबरोबरच जमीन तसेच पाण्यावर चालणाऱ्या अँफिबियस बसचाही वापर करण्याची सूचना गडकरी यांनी केली. या जलवाहतूक आराखड्यात दिव्याचाही समावेश करण्याची मागणी यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हा किफायतशीर पर्याय ठरणार असल्यामुळे दिव्याचा देखील या प्रकल्पात समावेश करण्याची मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाwater transportजलवाहतूक