शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरी यांनी चव्हाणांना केले लक्ष्य?, फडणवीस यांच्याशी जवळीक वाढल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 02:31 IST

एकेकाळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मंत्री अशी नवी ओळख दृढ झाल्यानेच गडकरी यांनी ‘डोंबिवली घाणेरडी’, अशी शेरेबाजी करुन चव्हाण यांना लक्ष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

- अनिकेत घमंडी डोंबिवली : एकेकाळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मंत्री अशी नवी ओळख दृढ झाल्यानेच गडकरी यांनी ‘डोंबिवली घाणेरडी’, अशी शेरेबाजी करुन चव्हाण यांना लक्ष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.यापूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या माध्यमातून चव्हाण हे गडकरी गटाचे, असे ओळखले जात होते. मात्र आता दुसºयांदा आमदार झाल्यानंतर व राज्यमंत्री म्हणून चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जवळीक खूप वाढली.मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच त्यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोपवले. त्यामुळे गडकरी यांचे लक्ष्य डोंबिवली अथवा डोंबिवलीकर नसून चव्हाण असल्याचे बोलले जात आहे. राज्यमंत्री चव्हाण यांना आमदारकीचे तिकिट मिळवून देण्यात गडकरी यांचा मोठा वाटा आहे.तत्कालीन आमदार-महापौर हरिश्चंद्र पाटील यांना आमदारकीचे तिकीट डावलून चव्हाण यांना २००९ मध्ये देण्यात आले. पाटील हे मुंडे गटाचे समर्थक होते. मुंडे गटाला शह देत गडकरी गटाने चव्हाण यांना उमेदवारी दिली होती.चव्हाण यांचे नेतृत्वगुण हेरुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी, त्यांना ठाणे, उल्हासनगर, भार्इंदर, पनवेल आदी ठिकाणी निवडणूक प्रभारी म्हणून, तसेच कोकणातील ग्रामपंचायत, नगरपरिषदांसह अन्य संपर्काची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यामुळे चव्हाण यांची ओळख अलीकडच्या काळात फडणवीस यांचे विश्वासू मंत्री, अशी झाली. डोंबिवलीतील गडकरी, तावडे यांच्या फेºया कमी झाल्या. नेमकी तीच सल गडकरींच्या मनात असल्याचे भाजपातील काहींचे म्हणणे आहे.>‘श्रेष्ठींच्या विधानावर मत देणे तत्त्वात नाही’गडकरी यांची डोंबिवलीवरील टीका, त्यावरुन उठलेले काहूर आणि त्याचे भाजपांतर्गत राजकारणाचे पदर याबाबत राज्यमंत्री चव्हाण यांना विचारले असता पक्षश्रेष्ठींच्या विधानावर मत देणे पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बसत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. कामातून बोलणे सर्वाधिक योग्य राहील असे सूचक विधान त्यांनी केले.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीdombivaliडोंबिवली