लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली परिसराला बुधवारीही पावसाने झोडपून काढले. या पावसात डोंबिवलीत दिवसभरात नऊ झाडे उन्मळून पडली. त्याचबरोबर डोंबिवली व कल्याणमधील सखल भागांमध्ये पाणी साचले. त्याचा फटका वाहतुकीला बसल्याने वाहतूक कोंडीचे चित्र मुख्य चौकांमध्ये होते. सकाळपासूनच हजेरी लावलेल्या मुसळधार पावसाने डोंबिवलीमधील निवासी विभागही पुरता जलमय झाला होता. अधून-मधून कोसळणाऱ्या जोरदार सरींनी कल्याणमधील शिवाजीचौक, महमदअली चौक, महात्मा फुले चौक, कुंभारवाडा, जोशी बाग, पारनाका, टिळकचौक, लालचौकी पूर्वेकडील तिसगाव, काटेमानिवली, कोळसेवाडी, मंगल राघोनगर आदी भागांमध्ये पाणी साचले होते.डोंबिवली एमआयडीसीतील युरो किड्स नर्सरी शाळेजवळच्या इलेक्ट्रीक ट्रान्सफार्मर समोरच पावसाच्या पाण्यामुळे मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात सकाळी सव्वासात वाजता लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी खासगी बस अडकून पडली. ही बस ट्रान्सफार्मरला धडकली असती तर स्फोट होऊन जीवितहानी झाली असती. सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी तत्काळ ‘महावितरण’शी संपर्क साधला. त्यानंतर क्र ेनच्या साहयाने खड्ड्यात अडकलेली ही बस बाहेर काढली. त्यामुळे संभाव्य अपघात टळल्याचे नलावडे यांनी सांगितले. डोंबिवली शहरात निवासी भागातील डोंबिवली नागरी सहकारी बँक, खंबाळपाडा, मंजुनाथशाळा, कोळेगाव, ब्राम्हण सभा सभागृह, एकतानगर, आर. पी. रोड, चार रस्ता, सागर्ली बालाजी मंदिर येथे झाडे पडल्याच्या घटना घडल्या. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
डोंबिवली शहरात पडली नऊ झाडे
By admin | Updated: June 29, 2017 02:45 IST