शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत नऊ महिन्यांत ४,४६१ जणांना श्वानदंश, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 05:06 IST

कामतघर-फेणेपाडा येथील डम्पिंग ग्राऊंडवर आठ वर्षांच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांनी लचके तोडून जीव घेतल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे. त्याच वेळी गेल्या नऊ महिन्यांत भिवंडीत ४,४६१ जणांना कुत्र्यांनी चावे घेतल्याने त्यांच्यावर रेबीजची लस टोचून घेण्याची वेळ आल्याची माहिती उघड झाली आहे.

भिवंडी : कामतघर-फेणेपाडा येथील डम्पिंग ग्राऊंडवर आठ वर्षांच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांनी लचके तोडून जीव घेतल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे. त्याच वेळी गेल्या नऊ महिन्यांत भिवंडीत ४,४६१ जणांना कुत्र्यांनी चावे घेतल्याने त्यांच्यावर रेबीजची लस टोचून घेण्याची वेळ आल्याची माहिती उघड झाली आहे.पालिकेच्या अर्थसंकल्पात कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी दरवर्षी २५ लाखांची तरतुद केली जाते, पण स्वच्छता व आरोग्य विभागाने २०१२ पासून निर्बीजीकरणाचे काम बंद केले. पालिकेची १५ शहरी आरोग्य केंद्रे शहरात ठिकठिकाणी असली, तरी तेथे रेबीजची लस उपलब्ध नाही. त्यामुळे कुत्रा चावलेल्या व्यक्तीला आरोग्य केंद्रातील डॉक्टर इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात पाठवितात. कुत्रा चावण्याच्या वाढणाºया घटना पाहता वैद्यकीय अधिकारी विद्या शेट्टी यांनी सर्व आरोग्य केंद्रात ही लस उपलब्ध करून देण्याची गरज होती, पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. इंदिरा गांधी रूग्णालयात जानेवारी २०१७ ते आॅगस्ट २०१७ पर्यंत ४,२१६ श्वानदंशाच्या रुग्णांची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात १७ तारखेपर्यंत २४५ रूग्णांना श्वानदंशामुळे रेबीजची लस दिल्याचे अधिकाºयांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने २००५-०६ मध्ये निविदा काढून पनवेलच्या राज्य कृषी व पशुवैद्यकीय तांत्रिक कुशल सेवा संस्थेमार्फत २००७ पर्यंत ३,९५७ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले. २००८ ते २०११ च्या मार्चपर्यंत अंबरनाथ अ‍ॅनिमल वेल्फेअर संस्थेने १८,९५९ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले. त्यानंतर मात्र हे काम बंद झाले.स्वच्छता व आरोग्य विभागातील निरीक्षकांच्या सर्र्व्हेनुसार शहरात सध्या ४,७५३ भटके कुत्रे आहेत. हा आकडा चुकीचा असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्या आधारे त्यांनी निर्बीजीकरण झालेल्या कुत्र्यांच्या संख्येबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.