शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

२० दिवसांत नऊ कोरोना रुग्ण; ठाण्यात नव्या व्हेरिएंटचा अहवाल प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 08:43 IST

ठाणे पालिका रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहरात २० दिवसांत कोरोनाचे नवे नऊ रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. देशात काही राज्यांत ‘जेएन १’ या ओमायक्रॉनच्या नव्या उपप्रकाराच्या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. ठाण्यात लागण झालेल्या रुग्णांच्या तपासणीचे नमुने पुण्याला पाठवले असून अद्याप अहवाल पालिकेला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिका आरोग्य विभागाने कोरोना चाचण्या वाढविण्याबरोबरच कळव्याच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांकरिता स्वतंत्र कक्ष उभारला आहे. 

 मंगळवारी कोरोनाबाधित महिला आढळून आली. ती मूळची बिहारची आहे. पतीसोबत ती १५ दिवसांपूर्वी ठाण्यात आली. तिला ताप, दमा आणि सर्दी असा त्रास होत होता. तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आली. तिच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील विशेष कक्षातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

डिसेंबर महिन्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. गेल्या २० दिवसांत शहरात नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी केवळ एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील विशेष कक्षात उपचारासाठी दाखल केले आहे. उर्वरित रुग्ण गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.

घाबरून जाऊ नका; फक्त काळजी घ्या !

कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिका आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दिवसाला २०० चाचण्या करण्यात येत असून, त्यात १२० शीघ्र प्रतिजन, तर आठ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येतात. कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तसेच विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. त्या ठिकाणी एकूण २० खाटा आहेत.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार दर महिन्याला सुमारे २५ रुग्णांचे नमुने पुणे येथील एनआयव्ही येथे तपासणीसाठी पाठविण्यात येतात. डिसेंबर महिन्यात एकूण नऊ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी सात रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या