शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पावसाचा रात्रीचा खेळ चाले; नऊ झाडे कोसळली, ५ वाहनांचे नुकसान

By अजित मांडके | Updated: June 26, 2023 12:52 IST

या वर्षी उशिरा सुरू झालेल्या पाऊस अजून पाहीजेल तसा बरसलेला नाही. मात्र गेल्या ४८ तासात १४४.३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठाणे : शहरात पावसाचा चक्क रात्रीचा खेळ चालला आहे. चोवीस तासात ८५.४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यातच मध्यरात्री अवघ्या तीन तासात ५७.११ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. अशाप्रकारे रात्री पाऊस झोडपत असताना सोमवारी सकाळीपासून पावसाचे बरसणे सुरूच होते. याचदरम्यान शहरात ९ ठिकाणी झाडे कोसळली असून ७ ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पाडल्या असून या घटनांमध्ये ०५ वाहनांचे नुकसान झाले आहे. तर कळवा येथील महापालिकेच्या रुग्णालयात सिलिंग पडली असून मुंब्र्यात विहीर आणि त्याच्या आजूबाजूचा भाग खचल्याने त्यामध्ये दुचाकी पडली आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. 

या वर्षी उशिरा सुरू झालेल्या पाऊस अजून पाहीजेल तसा बरसलेला नाही. मात्र गेल्या ४८ तासात १४४.३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यातच रविवारी सकाळी साडेआठ ते सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत असा चोवीस तासात ८५.४९ मिमी पाऊस झाला आहे. यामध्ये मध्यरात्री अडीच ते साडेतीन या एका तासात ३८.८७ मिमी पाऊस झाला आहे. तर अडीच ते साडेचार या तीन तासात ५७.११ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. सोमवारी सकाळीही पावसाची रिमझिम सुरू असून मधूनमधून पावसाची मोठी सर येत जात असल्याचे दिसत होते. 

एकीकडे पाऊस आणि दुसरी आपत्ती व्यवस्थापन कक्षात साहेब येथे झाडे पडले आहे. किंवा झाडाची फांदी पडली आहे. तर कुठे आग लागली असून कुठे विहीर आणि तिच्या आजूबाजूचा भाग खचला आहे. अशा एकूण ३९ तक्रारींची नोंद त्या कक्षात झालेली आहे. त्यामध्ये ९ ठिकाणी झाडे पडली असून ७ ठिकाणी झाडांच्या फांड्या तुटून वाहनांवर किंवा घरावर तसेच सरंक्षण भिंतीवर पाडल्या आहेत. यामध्ये ०४ चारचाकी तर एका दुचाकी अशा ०५ वाहनांचे नुकसान झाले आहे. एका ठिकाणी आग लागली होती. सहा ठिकाणी झाडांची स्थिती धोकादायक असून एका ठिकाणी कंपाऊंड भिंत पडली आहे. तसेच १२ अन्य घटनांचा ही या तक्रारींमध्ये समावेश आहे.

खचलेल्या विहिरीत दुचाकी पडलीमुंब्रा रेल्वे स्टेशन जवळील जीवन बाग या ठिकाणी असलेली विहीर आणि तिच्या आजूबाजूचा परिसर खचल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून खचलेल्या विहिरीत दुचाकी पडली आहे. 

पालिकेच्या रुग्णालयामधील पीओपी सिलिंग पडली ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील हृदयरोग विभागाच्या समोरील चालण्याच्या जागेमधील पीओपी (प्लास्टर) सिलिंग पडल्याची घटना रविवारी (२५ जून) रात्री सव्वा अकरा ते साडेअकराच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर सुमारे १०० मीटर लांब असलेल्या पीओपी सिलिंग पैकी २० मीटर पीओपी सिलिंग पडली असून उर्वरित सिलिंग धोकादायक झाल्याने ती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून काढण्यात आलेली आहे. 

संरक्षण भिंत चाळीवर पडलीवर्तक नगर, लक्ष्मी-चिराग नगर या ठिकाणी आय थिंक लोढा (iTHINK LODHA)ची अंदाजे ३५ फुट लांब व अंदाजे ०८ फूट उंच संरक्षण भिंत तसेच त्या भिंती लगत असलेल्या खंडू मुठे चाळीतील गणेश बेंडकुळे यांच्या घराची भिंत ही पडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास समोर आली. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकापट्टी बांधण्यात आली असून घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस