शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

येत्या रविवारचे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही! दा.कृ.सोमण यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 20:17 IST

हे खंडग्रास सूर्यग्रहण ओसेनिया, अंटार्क्टिका आणि दक्षिण ध्रुव प्रदेशातील भागातून दिसणार

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येत्या रविवारी २१ सप्टेंबर रोजी भाद्रपद अमावास्येच्या दिवशी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. हे खंडग्रास सूर्यग्रहण ओसेनिया, अंटार्क्टिका आणि दक्षिण ध्रुव प्रदेशातील भागातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

या सूर्यग्रहणाविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, या सूर्यग्रहणाच्यावेळी चंद्रबिंब ८५ टक्के सूर्यबिंबाला झाकून टाकणार आहे. हे सूर्यग्रहण १५४ सरॅास ग्रहणचक्रातील आहे.

सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत.

(१) खंडग्रास सूर्यग्रहण - ज्यावेळी सूर्यबिंबाचा थोडा भाग चंद्रबिंबाद्वारे झाकला जातो त्यावेळी ‘ खंडग्रास सूर्यग्रहण ‘ दिसते.(२) खग्रास सूर्यग्रहण - ज्यावेळी चंद्रबिंबामुळे संपूर्ण सूर्यबिंब झाकले जाते त्यावेळी ‘ खग्रास सूर्यग्रहण ‘ दिसते.(३) कंकणाकृती सूर्यग्रहण- खग्रास सूर्यग्रहणाच्यावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची तेजस्वी गोलाकार कडा ( कंकणासारखी ) दिसते. त्याला’ कंकणाकृती सूर्यग्रहण ‘ दिसते. सूर्यग्रहण हे कधीही

साध्या डोळ्यांनी पहावयाचे नसते. तसे पाहिल्यास दृष्टीस इजा होते. अंधत्व येण्याची शक्यता असते. म्हणून सूर्यग्रहण हे ग्रहणचष्म्यातूनच पहावयाचे असते.

भारतातून दिसणारे यापुढील सूर्यग्रहण २ ॲागस्ट २०२७ रोजी होणार असल्याचे सोमण यांनी सांगितले. ते जरी खग्रास सूर्यग्रहण होणार असले तरी भारतातून ते खंडग्रास स्थितीत दिसणार असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले.

सोमण यांनी यानंतर होणा-या १० सूर्यग्रहणाचे दिवसही सांगितले.

(१) कंकणाकृती सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी २०२६.(२) खग्रास सूर्यग्रहण १२ ॲागस्ट २०२६.(३) कंकणाकृती सूर्यग्रहण  ६ फेब्रुवारी २०२७.(४) खग्रास सूर्यग्रहण २ ॲागस्ट २०२७.(५) कंकणाकृती सूर्यग्रहण २६ जानेवारी २०२८.(६) खग्रास सूर्यग्रहण २२ जुलै २०२८.(७) खंडग्रास सूर्यग्रहण १४ जानेवारी २०२९.(८) खंडग्रास सूर्यग्रहण १२ जून २०२९.(९) खंडग्रास सूर्यग्रहण ११ जुलै २०२९.(१०) खंडग्रास सूर्यग्रहण ५ डिसेंबर २०२९.

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहण