शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: लग्नानंतर दोनच दिवसांत नवरदेवाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 06:54 IST

नवरदेव कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे लग्नकार्यासाठी उपस्थित असलेल्यांमध्ये खळबळ

जव्हार : ग्रीन झोनमध्ये असलेल्या जव्हार तालुक्याला कोरोनामुळे गालबोट लागले असून तालुक्यात सध्या १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, बुधवारी एका व्यक्तीचा विवाह समारंभ पार पडला, मात्र दोनच दिवसांत शुक्रवारी नवरदेव कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे लग्नकार्यासाठी उपस्थित असलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.कोरोनाबाधित असलेल्या एका शासकीय बसचालकाच्या संपर्कात आलेल्या खाजगी दवाखान्याच्या तीन नर्स आणि एका व्यवस्थापकाला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यवस्थापकाचे बुधवारी लग्नकार्य उरकून घेण्यात आले होते. मात्र आता हे नवरदेवच कोरोनाबाधित आढळल्यामुळे लग्नकार्यासाठी उपस्थित असलेल्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. तीन नर्स आणि व्यवस्थापक अशा चौघांच्या संपर्कात असलेले शेकडो रुग्ण व कुटुंबीयांची आरोग्य विभागाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच केळघर, पिपुर्णा व डेंगाचीमेट हे तीन ग्रामीण भाग व शहरी भागात नवापाडा, गोरवाडी व जांभुळविहीर या तीन ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून बंदी घालण्यात आली असल्याची माहिती जव्हार तहसीलदार संतोष शिंदे यांनी दिली.काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळलेला बसचालक नोकरीवरून आल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला. तो एका खासगी रुग्णालयात उपाचारासाठी गेला. त्या वेळी तेथील डॉक्टरांनी त्याला सरकारी रुग्णालयात पाठविले. तेथून त्याचे स्वॅब दोन वेळा पाठविण्यात आले, मात्र अहवाल निगेटिव्ह आले. यात पाच ते सहा दिवसांचा अवधी लागला. दरम्यान, तिसरा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आरोग्य विभागाने त्याच्या संपर्कातील त्या दवाखान्यातील कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले. शुक्रवारी उशिरा यातील तीन नर्स कर्मचारी तर एका व्यवस्थापकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.रुग्णवाढीची भीतीव्यवस्थापकाचे लग्नकार्य अहवाल येण्यापूर्वीच उरकण्यात आले. त्यामुळे दवाखान्यात उपाचारासाठी आलेले रुग्ण तसेच लग्नकार्यासाठी जमलेली मंडळी अशी संपकार्तील मोठी संख्या असल्याने रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या