शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

नव्या वृक्ष प्राधिकरण समितीने दिली तब्बल १ हजार वृक्ष तोडीला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 17:52 IST

वृक्ष प्राधिकरणच्या नव्या समितीकडून ठाणेकरांच्या भरपूर अपेक्षा होत्या. परंतु त्या अपेक्षा नव्या समितीने फोल ठरविल्या आहेत. समितीच्या झालेल्या पहिल्याच बैठकीत तब्बल १ हजारून अधिक वृक्ष तोडीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देवृक्ष तोडीच्या बदल्यात पाच वृक्ष लागवडीचा पालिकेचा दावाआयुक्तांनी केले विविध समित्यांचे गठण१३ ते १५ जानेवारी २०१८ या कालावधीत भरणार वृक्षवल्ली प्रदर्शनमृत वृक्ष तोडण्याचाही झाला निर्णय

ठाणे - मागील वृक्ष प्राधिकरण समितीचा कित्ता नव्या समितीने देखील गिरविला आहे. पहिल्याच बैठकीत नव्या समितीने तब्बल १ हजारहून अधिक वृक्ष तोडीचे प्रस्ताव मंजुर करुन बिल्डरधार्जिनी धोरणाला जणू पुन्हा पाठींबाच दिल्याचे दिसून आले आहे. यामुळे नव्या समितीनेही बांधकाम व्यवसायिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या प्रस्तावांना मान्यता दिल्याची चर्चा आता शहरात सुरु झाली आहे.मागील काही महिने वादादीत ठरत असलेली वृक्ष प्राधिकरण समिती अखेर गठीत झाली आहे. या समितीची पहिलीच बैठक मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीच्या विषय पटलावर महापालिकेच्या विविध प्रकल्पामध्ये बाधीत होत असलेले ४२५ वृक्ष तर बांधकाम व्यावसायिकांच्या विकास प्रस्तावांमध्ये बाधीत होत असलेले एक हजार ९० वृक्ष तोडण्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यामध्ये २२८ वृक्ष हे सुबाभुळ जातीची आहेत. या सर्व प्रस्तावांना समितीने मान्यता दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या विकास प्रस्तावामध्ये वृक्षांचा ठरलेला अडथळाही समितीने दूर केल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. महापालिकेच्या विविध प्रकल्पामध्ये आणि बांधकाम व्यावसायिकांच्या विकास प्रस्तावामध्ये बाधित होणाºया वृक्ष तोडण्यात येणार असले तरी त्या बदल्यात १६ हजार ३५० वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. तसेच पुर्नरोपन करण्यात येणाºया १६६२ वृक्ष तोडीच्या बदल्यात संबंधित विकासांकडून एकूण ८ हजार ३१० वृक्ष लागवड करण्यात येणार असून यामुळे शहरात एकूण २५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहेत. असे असले तरी वृक्ष तोडीच्या बदल्यात संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून समितीच्या धोरणाप्रमाणे वृक्ष लागवड करण्यात येईल का आणि वृक्ष प्राधिकरण समितीकडून खरोखरच त्यांची पहाणी केली जाईल का, असा सवाल आता शहरातून उपस्थित केला जात आहे.वृक्ष प्राधिकरण समितीचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख आणि सुलभ होण्यासाठी महापालिका आयुक्त व प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी विविध समित्यांची स्थापना केली आहे. यामध्ये न्यायालयीन पातळीवरील होणाºया निर्णयांचा अभ्यास करून त्याआधारे धोरण ठरविण्यासाठी चंद्रहास तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. प्रस्तावांना मंजुरी देण्याच्या अटी आणि शर्थींबाबत अभ्यास करण्यासाठी संतोष तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. तसेच वृक्षवल्ली प्रदर्शनाचे सुयोग्य पद्धतीने आयोजन करण्यासाठी पाच सदस्यांची समिती गठित करण्यात आली. यंदा १३ ते १५ जानेवारीला वृक्षवल्ली प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी मृत वृक्ष निदर्शनास येत आहेत. त्यामुळे या मृत वृक्षांचे संगोपन होऊ शकत नाही. त्यामुळे एक महिन्याच्या आत पालिका क्षेत्रातील सर्व मृत वृक्ष तोडण्याचा व त्या ठिकाणी नव्या वृक्षांचे रोपण करण्याचा निर्णय समितीने एकमताने घेतला. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेcommissionerआयुक्त