शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नव्या नियमाने वकिलांची संख्या कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:42 IST

बार असोसिएशन निवडणूक : अवघ्या १८४० सदस्यांचे घोषणापत्र, १९ जानेवारीनंतर छाननी

ठाणे : वन बार, वन व्होट ही संकल्पना राबवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी ठाणे बार असोसिएशनने सुरू केल्याने ठाण्यातील वकील सदस्यांची संख्या निम्म्याने घटली असल्याची माहिती बार असोसिएशनचे अध्यक्ष वकील प्रकाश भोसले यांनी बुधवारी दिली.

ठाणे न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ गुलाबराव गावंड आणि वकील प्रभाकर थोरात यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. ‘एका बार असोसिएशनचा सदस्य असलेला वकील अन्य बार असोसिएशनमध्येही सदस्यत्व स्वीकारून त्याद्वारे अनेक ठिकाणी मतदान करतो. त्यामुळे वन बार वन व्होट, ही संकल्पना राबवण्यात येण्यासंदर्भात आदेश देण्यात यावेत, अशी मागणी गावंड आणि थोरात यांच्यासह अन्य तीन याचिकाकर्त्यांनी केली. त्यावर ६ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एकाच बार असोसिएशनमध्ये सदस्यांना मतदान करता येईल, असे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी ठाणे न्यायालयाच्या बार असोसिएशनमध्ये करण्याचा निर्णय अध्यक्ष वकील प्रकाश भोसले यांनी घेत, सर्व वकील सदस्यांना प्रतिज्ञापत्र भरून देण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी १० जानेवारी २०१९ ही अंतिम मुदत दिली होती. ठाणे न्यायालयात तीन हजार ७९५ सदस्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी एक हजार ८४० सदस्यांनी आपापले घोषणापत्र दिले आहे. त्या घोषणापत्रांची छाननी १९ जानेवारीनंतर केली जाणार आहे. त्यानंतर, मतदारयादीला अंतिम स्वरूप दिले जाईल. यादी प्रसिद्ध केल्यावर हरकती मागवल्या जाणार आहेत. त्या हरकतीनंतर फ ेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे याआधी विविध बार असोसिएशनचे सदस्य असलेले वकील विविध बार असोसिएशनच्या निवडणुकीत मतदान करत असत. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे अशा प्रवृत्तींना चाप लागणार असल्याचे भोसले म्हणाले.यासंदर्भात याचिका दाखल करणारे अ‍ॅड. गुलाबराव गावंड म्हणाले की, ज्या वकिलांनी ठाणे बार असोसिएशनला हमीपत्र दिले आहे. तेच मतदान करू शकतात. त्यांनी वकील संघटनेच्या निवडणुकीत मतदान केल्यास त्यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवा अशा वकिलांच्या सनदीबाबतही कारवाई करू शकते, असे त्यांनी सांगितले.