शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात नैराश्येत अडकलेल्या तरुणांना युवा रिफ्रेश देणार नवी दिशा

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 2, 2020 16:38 IST

कोरोना काळात ज्या तरुणांना नैराश्य आले अशांना रिफ्रेश करून त्यांच्यात नवीन उमेद निर्माण केली जाणार आहे.

ठळक मुद्देतरुणांना युवा रिफ्रेश देणार नवी दिशा किरण नाकती यांचा पुढाकारठाण्यातून होणार सुरुवात

ठाणे : वुई आर फॉर युच्या माध्यमातून आपल्या ठाण्यातील असंख्य ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्याचं काम गेली ८ ते ९ महिने किरण नाकती व त्यांचे सेवेकरी करीत आहेत.त्याचप्रमाणे  *१ डिसेंबर २०२०* पासून वुई आर फॉर यु च्या माध्यमातून " *युवा रिफ्रेश* " हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी सुरू करण्यात आले .

या विभागाची सुरुवात ठाण्यातून होणार असून त्याकरिता *'नव्या पिढीला नवी दिशा देऊ या, वुई आर फॉर यु ला कनेक्ट होऊ या'* असं म्हणत कोरोनाकाळात नैराश्य पदरी आलेल्या, आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या ,आत्मविश्वास गमावलेल्या तसेच नकारात्मक विचार मनात येणाऱ्या तरुण-तरुणींना सुमपदेशन(कौन्सिलिंग) करण्यासाठी " *युवा रिफ्रेश* "या समुपदेशन विभागाची सुरुवात करण्यात आली.आज या कोरोनाकाळात कुणी कुणाचा भाऊ, कुणाचे वडिल, कुणाची होणारी पत्नी,कुणाचा बालपाणीचा मित्र गमावला आहे.यांना त्या नकारात्मक विचारातून बाहेर काढून पुन्हा आत्मविश्वास देण्यासाठी ,पुन्हा रिफ्रेश करण्यासाठी या विभागाची सुरुवात करण्यात आली आहे. या विभागाचे उदघाटन  *युवा खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे*  यांच्या हस्ते करण्यात आले. युवा रिफ्रेश मुळे युवा वर्गाला मानसिक बळ मिळेल,तसेच नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडून एका नव्या सकारात्मक विचाराकडे प्रेरित होण्याची ऊर्जा मिळेल.याची सुरुवात ठाणेजिल्ह्यापासून करीत आहोत.भविष्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात युवा रिफ्रेश पोहचणार आहे.या माध्यमातून तरुणांना नवी दिशा मिळेल.अशी माहिती युवा रिफ्रेशचे निर्माते किरण नाकती यांनी दिली. पोस्ट कोव्हीडच्या या वातावरणात मानसिकरित्या रिहाबिलेशनचे काम युवा रिफ्रेश करेल.युवा वर्ग आधीपासूनच इथे आहेच परंतु या माध्यमातून आणखीन मोठ्या संख्येने युवा रिफेशमुळे जोडला जाईल. युवा रिफ्रेशच्या माध्यमातून असंख्य तरुणांना मानसिक आधार मिळण्याचं कार्य होणार आहे असे डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितलेे.

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिकCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या