शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

नवा कोरोना व्हेरिएंट, घाबरू नका, पण सावध राहा! आयुष टास्क फोर्सचे डाॅ. उदय कुलकर्णी यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 09:10 IST

आपण काेराेनाच्या तीन लाटांना तोंड दिले आहे आणि लसीकरणाचे दोन डोस सर्वांना दिले आहेत. आपली सरकारी यंत्रणा, आपले जागरूक नागरिक यांना प्राथमिक खबरदारीचे उपायही माहीत आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : सध्या जग सावरून सण, सुटीचा आनंद घ्यायला सुरुवात करीत असतानाच ‘जेएनवन’ हा ओमायक्रॉनचा एक नवीन व्हेरियंट केरळमध्ये आढळला. तीनशेहून अधिक जणांना आठवडाभरात त्याची तपासणी सकारात्मक आली आहे. राज्य सरकारच्या आयुष टास्क फोर्समध्ये तीन वर्षे काम केल्यावर आज पुन्हा कोरोनाची बातमी दिसते तेव्हा ही धोक्याची घंटा तर नाही ना, असे मत सरकारच्या आयुष टास्क फोर्सचे ठाण्यातील सदस्य डाॅ. उदय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

आपण काेराेनाच्या तीन लाटांना तोंड दिले आहे आणि लसीकरणाचे दोन डोस सर्वांना दिले आहेत. आपली सरकारी यंत्रणा, आपले जागरूक नागरिक यांना प्राथमिक खबरदारीचे उपायही माहीत आहेत. 

आज तरी आपल्याकडे आयुर्वेदातील काढे, चल प्रवास सारखी रसायने आणि दिनचर्येतील बदल, जसे वारंवार वाफ घेणे, गुळण्या करणे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि हलके अन्न घेणे यांचा प्रभावी उपयोग करून प्रतिकार करता येतो हे वेळोवेळी आपण बघितलेच आहे. नाक गळणे, घसा खवखवणे, चव जाणे, वास येणे बंद होणे, ताप येणे, डोके दुखणे, डोळ्यांची चुरचुर अशी लक्षणे केवळ कोरोनाची नसून, सामान्य फ्लूचीही असू शकतात, असे डाॅ. कुलकर्णी यांनी सांगितले.

‘ती’ परिस्थिती येणार नाहीकाेविडच्या पहिल्या लाटेत ज्या प्रकारे परिस्थती उद्भवली हाेती तशी आता उद्भवणार नाही. केरळच्या घटनेवरून जरी घंटा वाजवली तरी घाबरून पुन्हा लॉकडाऊन, पुन्हा सक्तीची जमावबंदी किंवा वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू होईल, असे नसून योग्य खबरदारी घेऊन समाजात वावरणे, वैयक्तिक काळजी घेणे आणि आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला अशा कोणत्याही आजाराला बळी पडू न देणे सहज शक्य आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, सावध राहा, काळजी घ्या, असे  डाॅ. कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या