शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

नवीन ठाण्यासाठी क्लस्टर रखडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 03:05 IST

४६७० इमारती धोकादायक; बिल्डरांसाठी रहिवासी टांगणीला, मुंब्य्राची परिस्थिती चिंताजनक

ठाणे : क्लस्टर योजना लागू होईल तेव्हा होईल, परंतु आजही ठाण्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. ठाणे महापालिकेने ४६७० इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. मागील वर्षी हा आकडा ४७०५ एवढा होता. यात मुंब्य्रात सर्वाधिक १४६० धोकादायक इमारती आहेत. मात्र, नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खाडीपल्याड परिसरातील बिल्डरांच्या प्रकल्पांची चांदी व्हावी, चुनावी जुमला करता यावा, यासाठी क्लस्टरचे घोडे राज्यकर्त्यांनी रखडवल्याची चर्चा आहे.पावसाळा सुरू झाला की, धोकादायक इमारतींचा प्रश्न हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. पालिकेकडून जाहीर होणाºया इमारतींच्या संख्येवरूनही अनेकवेळा शंका उपस्थित झाल्या आहेत. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना हक्काचे घर मिळावे, म्हणून ठाण्यात क्लस्टर योजना मंजूर झाली असून पहिल्या टप्प्यात सहा भागांत ती लागू केली आहे. त्यानुसार, या भागांचा सर्व्हे सुरू आहे. मात्र, धोकादायक इमारतींचा प्रश्न हा आजही तसाच आहे. स्मार्ट सिटी म्हणून विकासाची स्वप्ने पाहणाºया ठाणे शहरात विविध ठिकाणी एकूण चार हजार ६७० धोकादायक इमारती असून त्यात राहणाºया लाखो नागरिकांपुढे सुरक्षित निवाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासन आणि प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. या धोकादायक इमारतींपैकी सर्वाधिक दिवा आणि मुंब्य्रात आहेत. यामुळे तलावांचे ठाणे याऐवजी धोकादायक इमारतींचे ठाणे ही शहराची नवी ओळख ठरू लागली आहे.महापालिका क्षेत्रात ७० टक्कयांहून अधिक अनधिकृत बांधकामे असून यात झोपडपट्टी विभागाचे मोठे प्रमाण आहे. गेल्या वर्षी या वस्त्यांच्या पुनर्विकासासाठी समूह विकास योजना मंजूर केली. मात्र, तिच्या अंमलबजावणीच्या अगदीच प्राथमिक टप्प्यात आहे. ती कधी पूर्ण होईल, याबाबत नागरिकांच्या मनात साशंकता आहे. दरवर्षी पावसाळ्यात या इमारतींमधील रहिवाशांची झोप उडते. त्यांच्या पुनर्विकासासाठी तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे झाले नाही. या इमारतींमध्ये सुमारे एक लाखांहून अधिक रहिवासी वास्तव्यास आहेत. योग्यवेळी या इमारतींचा पुनर्विकास झाला असता, तर पालिकेला कोट्यवधीचे उत्पन्न मिळाले असते. शिवाय, शहरात किफायतशीर दरात घरे उपलब्ध झाली असती. मात्र, अशा परिस्थितीत नवीन ठाण्यातील गृहनिर्माण विकासावर परिणाम झाला असता. त्यामुळे पुनर्विकास योजनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :thaneठाणे