शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

चुलत्याचा खून करणाऱ्या पुतण्याला जन्मठेपेची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा निकाल

By जितेंद्र कालेकर | Updated: September 27, 2023 21:36 IST

वाट्याला खराब जमीन दिल्याने जव्हारमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आपल्या वाटणीला खराब जमीन दिल्याच्या रागातून अंबू बुधर (७५, रा. बेहडपाडा, वावर वांगणी, जव्हार, जि. पालघर) या चुलत्याचा खून करणाऱ्या रामदास बुधर (४५, रा. बेहडपाडा, पालघर) या पुतण्याला जन्मठेपेची तसेच पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने बुधवारी सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे. अंबु हे वावर वांगणी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच नवसू यांचे वडिल होते.

यातील अंबू आणि रामदास या काका पुतण्यांमध्ये नेहमीच शेताच्या जागेतून वाद होत होते. त्यातच आपल्या वाट्याला चुलत्याने खराब जमीन दिल्याची सल रामदासच्या मनात होती. त्यांची बेहेडगावच्या हद्दीतच रस्त्यालगत १७ एकर सामायिक जमीन आहे. ही जमीन त्यांनी आपसात वाटून घेतली होती. त्यातील अर्धी जमीन अंबू आणि त्यांची मुले झिपर व नवसू हे कसत होते. अर्धी जमीन रामदास आणि त्याचा भाऊ राजाराम बुधर हे कसत होते. आपल्या वाट्याला खराब जमीन दिल्याच्या रागातून रामदास याने ५ मार्च २०१६ रोजी पहाटे ६.३० ते ६.४५ वाजण्याच्या दरम्यान बेहेडपाड्यातील अंबू यांच्या शेतावर जाऊन कुऱ्हाडीच्या बाेथट बाजूने अंबू यांच्या तोंडावर आणि खांद्यावर, छातीवर, पोटावर जबर प्रहार केले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

आरोपी रामदास याला १० मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. याच खटल्याची सुनावणी ठाण्याच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. रचना आर. तेहरा यांच्या न्यायालयात २७ सप्टेंबर रोजी झाली. यामध्ये संध्या म्हात्रे यांनी सरकारी वकील म्हणून पाहिले. त्यांनी १२ साक्षीदार तपासले. यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. मात्र परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर गुन्हयात आरोपीला दोषी मानण्यात आले. पोलिस निरीक्षक के. व्ही. नाईक यांनी तपासी अधिकारी म्हणून तर पोलिस नाईक पाचोरे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय