शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नेहरू तारांगणाची दुरूस्ती पडली लांबणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 18:17 IST

कल्याण: मुंबई दर्शनाला निघणा-या केडीएमसीच्या शाळेच्या सहलीला आता होळी सणानंतरच मुहूर्त मिळणार आहे. सहलीच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण असलेल्या नेहरू तारांगणाची दुरूस्ती लांबणीवर पडल्याने सहलीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. तारांगणाची दुरूस्ती ही २ मार्चपर्यंत चालू राहणार असल्याने उन्हाचे चटके सहन करीत सहलीचा आनंद लुटण्याची नामुष्की विद्यार्थ्यांवर ओढावणार आहे. याला शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार कारणीभूत ठरला असताना २७ फेब्रुवारीला सहल निघेल हा सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी केलेला दावाही फोल ठरला आहे.

ठळक मुद्दे२७ फेब्रुवारीचा सभापतींचा दावा ठरला फोलहोळीनंतरच निघणार सहल

कल्याण: मुंबई दर्शनाला निघणा-या केडीएमसीच्या शाळेच्या सहलीला आता होळी सणानंतरच मुहूर्त मिळणार आहे. सहलीच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण असलेल्या नेहरू तारांगणाची दुरूस्ती लांबणीवर पडल्याने सहलीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. तारांगणाची दुरूस्ती ही २ मार्चपर्यंत चालू राहणार असल्याने उन्हाचे चटके सहन करीत सहलीचा आनंद लुटण्याची नामुष्की विद्यार्थ्यांवर ओढावणार आहे. याला शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार कारणीभूत ठरला असताना २७ फेब्रुवारीला सहल निघेल हा सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी केलेला दावाही फोल ठरला आहे.गतवर्षी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता आणि केडीएमसी शिक्षण समितीची लांबणीवर पडलेली सभा यामुळे शालेय सहलीचा प्रस्ताव वेळेत मंजूर होऊ शकला नाही परिणामी विद्यार्थी सहलीपासून वंचित राहीले. याआधी दोन वर्षे तांत्रिक कारणामुळे सहल काढण्यात आली नव्हती. दरम्यान यंदाही शिक्षण विभागाच्या भोंगळ आणि उदासिन कारभारामुळे सहल लांबणीवर पडली असून विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद आजवर लुटता आलेला नाही. यंदा ‘मुंबई दर्शन’ हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. चौथी ते आठवी इयत्तेतील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना सहलीला नेण्यात येणार आहे. मुंबई दर्शनमध्ये नेहरू तारांगण, तारापोरवाला मत्स्यालय, राणीची बाग याठिकाणी दिवसभरात नेले जाणार आहे. परंतू सध्या नेहरू तारांगणाचे दुरूस्तीचे काम सुरू असल्याने २६ फेब्रुवारीपर्यंत ते बंद ठेवण्यात आले आहे त्यामुळे २६ तारखेनंतरच सहल निघेल असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगितले जात होते. तर २७ फेब्रुवारीला सहल निघेल असा दावा शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी केला होता. परंतू नेहरू तारांगणाचे दुरूस्तीचे काम २ मार्च पर्यंत चालणार असल्याने त्यानंतरच सहल निघेल अशी माहीती शिक्षण विभागाचे उपायुक्त नितिन नार्वेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. २ मार्चला होळी आहे तर ३ मार्चला धुलीवंदन आहे. सुमारे साडेचार हजार विद्यार्थी सहलीला नेण्यात येणार असल्याने ही सहल टप्याटप्याने काढली जाणार असल्याने मार्चच्या पहिल्या अथवा दुस-या आठवडयापर्यंत हा सहलीचा कार्यक्रम चालेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली