ठाणे : शहर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांना दंड आकारून चाप बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने चार वर्षांपूर्वी घेतला. त्या उपविधीला दोन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर मंजुरी मिळूनही त्याची अंमलबजावणी न झाल्याचे पर्यावरण अहवालात उघड झाले आहे. त्यामुळे घाण करणाऱ्यांना चाप बसणार कसा, असा सवाल उपस्थित झाला आहे. शहरात आजघडीला ८०० मेट्रीक टन कचरा निर्माण होत असून तो गोळा करण्यासाठी पालिकेजवळ १५० घंटागाड्या आहेत. पाच वर्षांपूर्वी शहरात कचरा टाकण्याची ५०० पेक्षा अधिक ठिकाणे होती. ती आता १५० वर आली असली तरी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांची संख्या मात्र कमी होत नाही. केवळ इथपर्यंतच हे प्रमाण मर्यादित नसून रस्त्यांवर थुंकणे, स्नान करणे, इमारतीची मलवाहिनी अथवा जलवाहिनी फुटणे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचऱ्याचे विभक्तीकरण करणे, अशा अनेक गोष्टींचे पालन न केल्यास पालिकेकडून २००५ पासून दंड वसूल करण्यात येत आहे. २०१२ साली तयार केलेल्या उपविधीमध्ये नवीन दर निश्चित केले आहेत. यात १० रु पयांपासून १०० रु पयांपर्यंत वाढ केली आहे. काही प्रकारांमध्ये तर ही वाढ दुपटीने सुचवली आहे. त्यामुळे १०० रु पयांपासून २० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालात या उपविधीला मंजुरी मिळाल्याचा हवाला देण्यात आला आहे. त्यामुळे या नव्या उपविधीनुसार दंडाची वसुली होणे अपेक्षित असताना अद्यापही त्याची अंमलबजावणी घनकचरा विभागाने केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास होणार दंडतपशीलदंडकचरा टाकणे२००सार्वजनिक ठिकाणी थुंकणे१००सार्वजनिक ठिकाणी अंघोळ करणे१००मूत्रविसर्जन१५०प्राणी व पक्ष्यांना खाद्य भरवणे५००रस्त्याच्या कडेने शौचास बसणे१५०व्यावसायिक वाहनांना रस्त्याच्या कडेला धुणे१०००रस्त्याच्या कडेला कपडे व भांडी धुणे१००अस्वच्छ परिसर आणि आवार१०,००० अशा प्रकारे उपविधीत दंडाची रकम सुचविली आहे.इमारतीच्या पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमधील सांडपाण्याच्या पाइपलाइनमधील गळती आणि त्यामुळे इतरांना होणारा त्रास आणि सूचना दिल्यानंतरही १० दिवसांत दुरुस्ती न केल्यास - १०,०००
ठाण्यात कचऱ्याच्या दंडवसुलीत दुर्लक्ष
By admin | Updated: December 25, 2016 04:37 IST