शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नागरिकांच्या दैनंदिन तणावमृक्तीसाठी ‘सहज साधना’ ध्याय साधनेची गरज

By सुरेश लोखंडे | Updated: January 4, 2019 20:49 IST

मुंबई, ठाणे परिसरांतील नागरिकांसह बालकांसाठी येथील घोडबंदर परिसरात नरसिंहा यांच्या ‘ध्यान उत्सव’ दोनदिवसीय ध्यान साधना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ५ जानेवारीला ३.३० वाजता ‘मुलांमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजवणारा’ कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी त्या ठाण्यात आल्या असता त्यांनी मुंबईकरांच्या सुखशांतीसाठी ‘सहज साधना’ ही साधी सोपी साधना सांगितली. केवळ २० मिनिटांची ही साधना दिवसातून केवळ दोन वेळा केल्यास धावत्या मुंबई, ठाणेकरांना सहज मन:शांती मिळवता येईल. ताणतणावातून निर्माण होणाऱ्या वाईट विचारांपासून मुक्ती मिळणार असल्याचे भानुदीदींनी स्पष्ट केले. याशिवाय, सत्त्वा या अ‍ॅपवरदेखील गाइडेड मेडिटेशन ऐकता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देकेवळ २० मिनिटांची ही साधना दिवसातून केवळ दोन वेळा धावत्या मुंबई, ठाणेकरांना सहज मन:शांती ‘आर्ट ऑफ  लिव्हिंग’ संस्थापक श्री श्री रवी शंकर यांच्या भगिनी भानुमाथी नरसिंहा (भानूदीदी

सुरेश लोखंडेठाणे : मुंबई, ठाणे परिसरांतील नागरिकांचे जीवन मोठ्या धकाधकीचे, ताणतणावाचे, धावपळीचे आहे. यातूनही त्यांना मन:शांती लाभावी, यासाठी ‘सहज साधना’ या साध्या, सरळ आणि सोप्या ध्यान साधनेची गरज असल्याचे ‘आर्ट ऑफ  लिव्हिंग’ संस्थापक श्री श्री रवी शंकर यांच्या भगिनी भानुमाथी नरसिंहा (भानूदीदी) यांनी शुक्रवारी सांगितले.मुंबई, ठाणे परिसरांतील नागरिकांसह बालकांसाठी येथील घोडबंदर परिसरात नरसिंहा यांच्या ‘ध्यान उत्सव’ दोनदिवसीय ध्यान साधना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ५ जानेवारीला ३.३० वाजता ‘मुलांमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजवणारा’ कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी त्या ठाण्यात आल्या असता त्यांनी मुंबईकरांच्या सुखशांतीसाठी ‘सहज साधना’ ही साधी सोपी साधना सांगितली. केवळ २० मिनिटांची ही साधना दिवसातून केवळ दोन वेळा केल्यास धावत्या मुंबई, ठाणेकरांना सहज मन:शांती मिळवता येईल. ताणतणावातून निर्माण होणाऱ्या वाईट विचारांपासून मुक्ती मिळणार असल्याचे भानुदीदींनी स्पष्ट केले. याशिवाय, सत्त्वा या अ‍ॅपवरदेखील गाइडेड मेडिटेशन ऐकता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रवी शंकर यांचे ‘गुरुदेव’ आत्मचरित्र भानुदीदींनी लिहिले आहे. याशिवाय, ‘गॉड अ‍ॅण्ड गॉडेस’ हे देवीदेवतांचे माहात्म्य स्पष्ट करणारा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. यानंतर, त्या लवकरच ‘अष्टलक्ष्मी’ या नावाचे पुस्तक प्रकाशन करण्याच्या तयारीत आहेत. यासारख्या दुर्मीळ पुस्तकांच्या लिखाणासह देशात व परदेशात ‘ध्यान साधना’चे विविध कार्यक्रम घेण्यासाठी मिळणारी ऊर्जा बंधू श्री श्री रवी शंकर यांच्याकडून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.         सध्या सोशल मीडियात वाढत जाणा-या विकृततेवर उपाययोजना विचारली असता त्या म्हणाल्या की विश्वात चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी आहेत. यापैकी कोणाकडे आकर्षित व्हायला पाहिजे हे ठरवणे गरजेचे आहे. ‘ध्यान’ साधनेच्या एकाग्रतेने वाईट विचारांचा नायनाट होऊन व्यक्तीला सकारात्मक व मनशांतीच्या लाभ मिळत असल्याचे वास्तव त्यांनी लक्षात आणून दिले. भानूदिदींच्या भारतभर ६१८ शाळा आहेत. त्यामध्ये ६७ हजार मुले मोफत शिक्षण घेत आहेत. याप्रमाणेच महाराष्ट्रात ठाण्यासह ठिकठिकाणी नऊ शाळा कार्यरत असून त्यातही दोन हजार मुलांचे मोफत शिक्षण दिदींकडून दिले जात आहे.........राम मंदिर बांधण्याची गरजसध्या राम मंदिर बांधण्यासाठी देशात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर भानूदिदींना विचारणा केली असता त्यांनी पटकन राम मंदिरची गरज असल्याचे भावनिक उद्गार काढून अध्योद्यात बांधण्यात येणाºया मंदिरास पाठिंबा दर्शविला आहे. त्यानंतर सध्याच्या केंद्रातील सरकारविषयी बोलते करण्याचा प्रयत्न केला असता त्यावर बोलणे त्यांनी टाळले.

टॅग्स :thaneठाणेartकला