शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या दैनंदिनी तणावमृक्तीसाठी ‘सहज साधना’ ध्यान साधनेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 21:09 IST

मुंबई, ठाणे परिसरांतील नागरिकांसह बालकांसाठी येथील घोडबंदर परिसरात नरसिंहा यांच्या ‘ध्यान उत्सव’ दोनदिवसीय ध्यान साधना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ५ जानेवारीला ३.३० वाजता ‘मुलांमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजवणारा’ कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी त्या ठाण्यात आल्या असता त्यांनी मुंबईकरांच्या सुखशांतीसाठी ‘सहज साधना’ ही साधी सोपी साधना सांगितली. केवळ २० मिनिटांची ही साधना दिवसातून केवळ दोन वेळा केल्यास धावत्या मुंबई, ठाणेकरांना सहज मन:शांती मिळवता येईल. ताणतणावातून निर्माण होणाऱ्या वाईट विचारांपासून मुक्ती मिळणार असल्याचे भानुदीदींनी स्पष्ट केले. याशिवाय, सत्त्वा या अ‍ॅपवरदेखील गाइडेड मेडिटेशन ऐकता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे ‘आर्ट ऑफ  लिव्हिंग’ संस्थापक श्री श्री रवी शंकर यांच्या भगिनी भानुमाथी नरसिंहा (भानूदीदीधकाधकीचे, ताणतणावाचे, धावपळीचे आहे. यातूनही त्यांना मन:शांती लाभावी, यासाठी ‘सहज साधना’केवळ २० मिनिटांची ही साधना दिवसातून केवळ दोन वेळा केल्यास धावत्या

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई, ठाणे परिसरांतील नागरिकांचे जीवन मोठ्या धकाधकीचे, ताणतणावाचे, धावपळीचे आहे. यातूनही त्यांना मन:शांती लाभावी, यासाठी ‘सहज साधना’ या साध्या, सरळ आणि सोप्या ध्यान साधनेची गरज असल्याचे ‘आर्ट ऑफ  लिव्हिंग’ संस्थापक श्री श्री रवी शंकर यांच्या भगिनी भानुमाथी नरसिंहा (भानूदीदी) यांनी शुक्रवारी सांगितले.मुंबई, ठाणे परिसरांतील नागरिकांसह बालकांसाठी येथील घोडबंदर परिसरात नरसिंहा यांच्या ‘ध्यान उत्सव’ दोनदिवसीय ध्यान साधना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ५ जानेवारीला ३.३० वाजता ‘मुलांमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजवणारा’ कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी त्या ठाण्यात आल्या असता त्यांनी मुंबईकरांच्या सुखशांतीसाठी ‘सहज साधना’ ही साधी सोपी साधना सांगितली. केवळ २० मिनिटांची ही साधना दिवसातून केवळ दोन वेळा केल्यास धावत्या मुंबई, ठाणेकरांना सहज मन:शांती मिळवता येईल. ताणतणावातून निर्माण होणाऱ्या वाईट विचारांपासून मुक्ती मिळणार असल्याचे भानुदीदींनी स्पष्ट केले. याशिवाय, सत्त्वा या अ‍ॅपवरदेखील गाइडेड मेडिटेशन ऐकता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रवी शंकर यांचे ‘गुरुदेव’ आत्मचरित्र भानुदीदींनी लिहिले आहे. याशिवाय, ‘गॉड अ‍ॅण्ड गॉडेस’ हे देवीदेवतांचे माहात्म्य स्पष्ट करणारा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. यानंतर, त्या लवकरच ‘अष्टलक्ष्मी’ या नावाचे पुस्तक प्रकाशन करण्याच्या तयारीत आहेत. यासारख्या दुर्मीळ पुस्तकांच्या लिखाणासह देशात व परदेशात ‘ध्यान साधना’चे विविध कार्यक्रम घेण्यासाठी मिळणारी ऊर्जा बंधू श्री श्री रवी शंकर यांच्याकडून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेartकला