शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 03:13 IST

केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प गरिबांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांवर घाव घालणारा आहे. पेट्रोल, डिझेल या इंधनांच्या किमती वाढवल्याने दूध, भाज्या यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला आहे.

ठाणे/मुंब्रा : केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प गरिबांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांवर घाव घालणारा आहे. पेट्रोल, डिझेल या इंधनांच्या किमती वाढवल्याने दूध, भाज्या यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. इंधनावर सेस टॅक्स वाढवल्याने त्याचा परिणाम गरिबांच्या अन्नावर झाला आहे. यामुळे हा अर्थसंकल्प देशातील शेतकरी, मजूर, लहान व्यापारी, मध्यमवर्गीयांवर अन्याय करणारा आहे. याचाच अर्थ भाजपा सरकार गरिबांविरोधातील असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसने आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सायकल आणि बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकºयांनी चक्क चूल पेटवून त्यावर अन्न शिजवले.केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मुंब्रा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. केंद्राने नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्याला गरिबांच्या आणि देशविरोधातील अर्थसंकल्प मानून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंब्रा तहसीलदार कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून चुलीवर स्वयंपाक बनवून सरकारचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या मोर्चाचे आयोजन कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान आणि युवक अध्यक्ष शानू पठाण यांनी केले होते. हे सरकार देश आणि गरिबांविरोधातील आहे, पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील व्यापारी, कारखानदारवर्गही देशोधडीला लागत आहे. आईवडिलांनी मोठ्या कष्टाने मुलामुलींना शिक्षण देऊन उच्चशिक्षित केले आहे. मात्र, या मुलांसमोरचे भविष्य अंधकारमय झाले आहे. देशाचे पंतप्रधान अशा मुलांना पकोडे विकायला सांगत आहेत. रस्त्यावर हातगाड्या लावून पकोडे विकण्यासाठीच आम्ही मुलांना शिक्षित केले आहे का, असा सवाल करून आमदार आव्हाड यांनी मोदी यांच्या चुकीच्या धोरणांचा निषेध केला. राज्याचे सरकार चालवणाºया फडणवीस सरकारचाही समाचार घेतला.देशात आणि राज्यात जातीय द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. विरोधकांची पोलिसांच्या बळावर मुस्कटदाबी केली जात आहे. विरोधकांवर जरब बसावी म्हणून भुजबळ यांच्यासारख्यांना कारागृहाबाहेर येऊ दिले जात नाही. हे सरकार सत्तेवर येताच देशाच्या संविधानाला धोका निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, यावेळी चुलीवर बनवलेले अन्न मोर्चेकºयांनी खाल्ले.

टॅग्स :thaneठाणे