शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला रोखले हेच राष्ट्रवादीचे यश

By admin | Updated: February 24, 2017 07:46 IST

काँग्रेसबरोबर आघाडी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेला विलंब, जागावाटपामध्ये केलेली दिरंगाई यामुळे

 जितेंद्र कालेकर / ठाणेकाँग्रेसबरोबर आघाडी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेला विलंब, जागावाटपामध्ये केलेली दिरंगाई यामुळे ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला आपली ताकद वाढवता आली नसली तरी राज्यात सत्ता नाही आणि शिवसेना व भाजपा या दोन हत्तींच्या झुंजीतही आपले मागील संख्याबळ राखण्यात या पक्षाने यश मिळवले आणि ठाण्यात दुसऱ्या क्रमांकाकरिता सुरु असलेल्या स्पर्धेत भाजपाला पिछाडीवर टाकले.या वेळी सत्तेसाठी राष्ट्रवादीची मदत इतर पक्षांना घ्यावी लागेल, असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. शिवसेनेला मोठे यश लाभल्याने तशी वेळ आली नाही. राष्ट्रवादीने लढवलेल्या ८७ पैकी निम्म्याही जागा राष्ट्रवादीला जिंकता आलेल्या नाहीत. आघाडीच्या १३१ पैकी राष्ट्रवादीच्या वाट्याला ७२ जागा आल्या होत्या. कळवा-मुंब्य्रात दोघांमध्ये एकमत न झाल्याने १५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत झाली. २०१२ मध्ये १३० पैकी राष्ट्रवादीने ३४, तर काँग्रेसने १८ जागा जिंकून शिवसेना-भाजपा युतीला घाम फोडला होता.या वेळी सेना-भाजपाच्या युतीच्या रखडलेल्या चर्चेवर आघाडीचा निर्णय घेणाऱ्या राष्ट्रवादीने अखेरपर्यंत उमेदवार निश्चित केले नव्हते. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी अवधी मिळालाच नाही. एकीकडे आव्हाडांनी उमेदवारांच्या एबी फॉर्मच्या वाटपापासून ते प्रचारापर्यंतची धुरा एकहाती ठेवल्याने वसंत डावखरे, गणेश नाईक, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ही नेते मंडळी प्रचारात फारशी दिसलीच नाही. हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, टीडीसीचे अध्यक्ष बाबाजी पाटील, जितेंद्र पाटील या पक्षासाठी प्रतिष्ठेच्या जागा जिंकण्यात राष्ट्रवादीने यश मिळवले, ही या पक्षासाठी जमेची बाजू म्हणावी लागेल. राष्ट्रवादीचे नेते तथा अध्यक्ष शरद पवार यांच्या एकाच दिवशी दिवा आणि वागळे इस्टेट भागात झालेल्या दोन प्रचारसभा, सुप्रिया सुळे यांच्या मोजक्या चौकसभा आणि रॅली वगळता पक्षाला प्रचारामध्ये फारसा रंग भरताच आला नाही. आव्हाडांकडे ठाण्याच्या प्रचाराची मुख्य धुरा असली, तरी त्यांचाही प्रचार कळवा आणि मुंब्य्राच्या परिघातच दिसला. शहरात तर तो केवळ पोस्टरबाजीत अडकला. अगदी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुतण्याचीही जागा पोषक वातावरण असून राखता आली नाही. सत्ताधारी सेनेने केलेला भ्रष्टाचार आणि गैरकारभाराची आकडेवारीनिहाय पत्रकार परिषदेद्वारे जशी त्यांनी माहिती दिली, तशी ठाण्याच्या विकासासाठी नेमके काय करणार आहे, याचा तपशील मात्र ते मांडू शकले नाहीत. आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीच प्रचाराची धुरा वाहिली. तिकीटवाटपातील कुरबुरी आणि अंतर्गत गटातटांच्या राजकारणाचे ओंगळवाणे दर्शन निवडणुकीत झाले.