शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

 विहिरीतील पाण्यासोबत राष्ट्रवादीतील वाद दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 06:00 IST

महापालिका निवडणुकीत दुस-या क्रमांकाच्या जागा मिळवणा-या राष्ट्रवादीमध्ये एकाच प्रभागातील दोन नगरसेवकांमध्ये सध्या फेसबुक वॉर सुरू झाले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील विरुद्ध ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांच्यात ते सुरू आहे.

- अजित मांडके ठाणे : महापालिका निवडणुकीत दुस-या क्रमांकाच्या जागा मिळवणा-या राष्ट्रवादीमध्ये एकाच प्रभागातील दोन नगरसेवकांमध्ये सध्या फेसबुक वॉर सुरू झाले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील विरुद्ध ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांच्यात ते सुरू आहे. विहिरीतील दूषित पाण्याच्या मुद्यावरून हा वाद आता आणखी उफाळला असून विहिरीच्या दुरुस्तीच्या श्रेयावरून दोघांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे.ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक मिळवून तब्बल ३४ जागा जिंकल्या. असे असूनही या निवडणुकीत राष्टÑवादीत तीन गट पडले होते. निवडणुकीनंतर ते बदलले असेल, असे वाटत होते. परंतु, प्रत्यक्षात आता राष्टÑवादीच्या दोन नगरसेवकांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाले आहे. हे कोल्ड वॉर थेट फेसबुकवर आल्याने सध्या हे दोन्ही नगरसेवक चर्चेत आहेत. हे दोघेही प्रभाग क्रमांक २३ मधून निवडून आले आहेत. पाटील हे ‘अ’ आणि केणी ‘ड’ मधून निवडून आले आहेत. त्यात पाटील हे आव्हाड गटाचे मानले जात असून केणी हे माजी मंत्री गणेश नाईक गटाचे मानले जातात. निवडणुकीच्या काळात नाईक गटाने केलेल्या कृत्यामुळे राष्टÑवादीला तीन ते चार जागांचा फटकाही बसल्याचा दावा आव्हाड गटाने केला होता. त्यात आता फेसबुक वॉर सुरू झाल्याने हे दोन्ही गट पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.कळव्यातील मारुती मंदिर परिसरातील विहिरींमधून अनेक दिवस दुर्गंधी येत असून परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याची तसेच विहिरीतील पाणी प्रदूषित झाल्याची स्थानिकांची तक्र ार होती.त्यानुसार, येथे स्वत: हजेरी लावून ती साफ करून घेतल्याची पोस्ट केणी यांनी फेसबुकवर टाकली होती. त्यानंतर, त्यांच्या कामाला अनेकांनी लाइकही केले होते. परंतु, प्रत्यक्षात दोन दिवस पालिकेकडे पाठपुरावा केल्याचा दावा पाटील यांनी केणी यांच्या पोस्टवर कमेंट करून केला आहे. त्यानंतर, ही विहीर साफ झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. पाटील यांनी त्यांच्या फेसबुकवर ही पोस्ट शेअर करणे अपेक्षित होते. असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. परंतु, प्रत्यक्षात तसे न करता त्यांनी थेट केणी यांच्या कमेंटवर पोस्ट टाकल्याने हे कोल्ड वॉर सुरू झाल्याची चर्चा आहे.माझ्याकडे नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या, त्यानुसार मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. परंतु, आमच्यात कामाच्या श्रेयावरून वाद नाही.- मुकुंद केणी,नगरसेवक, राष्ट्रवादीदोन दिवस मी महापालिकेत पाठपुरावा केला होता. त्यानुसार, या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. परंतु, केणी यांनी केलेल्या कौतुकासाठी ही पोस्ट टाकली आणि त्यांना फोन करूनही अभिनंदन केले आहे.- मिलिंद पाटील,विरोधी पक्षनेते, ठामपा