शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, कार खेचून सरकारचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 15:47 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी महागाईच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. यावेळी पेट्रोल पंपा पर्यंत कार खेचत नेण्यात आली. तसेच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ठळक मुद्देपेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात अनोखे आंदोलनकाळे कमळ देऊन केला सरकारचा निषेध

ठाणे - महागाईने जनतेचे कंबरडे मोडलेले असतानाच मंगळवारपासून पुन्हा इंधनाचे दर वाढू लागले आहेत. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच विरोधी पक्षनेते मिलींद पाटील आणि प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चक्क कार ओढत तसेच दुचाकीला हातगाडीवर ठेवून पेट्रोलपंपापर्यंत नेण्यात आली. तसेच पेट्रोल पंपावर नागरिकांना काळ्या गुलाबाची प्रतिकृती देऊन दरवाढीचा आणि भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.          पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाईच्या वणव्यात होरपळत असल्याचा आरोप ठाणेराष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी केला. इंधन दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे पक्ष कार्यालयापासून तीन पेट्रोलपंपापर्यंत अनोखी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये चक्क एक कार खेचत तसेच दुचाकींना धक्का मारत पेट्रोलपंप गाठण्यात आला. गरिबांची चेष्टा बंद करा, पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, मोदी सरकार हाय-हाय, पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.              पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणार्‍या  लोकांना काळे कमळ देऊन सरकारचा निषेध करण्यात आला. हे कमळ देऊन दरवाढ करणार्‍या अशा सरकारला निवडून दिल्याची आठवण करून देण्यात आली. यावेळी माजी खासदार तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, सबंध देशाचा विचार केल्यास राज्यात इंधनावर सर्वाधिक कर आकारले जात आहेत. महागाईने जनता मेटाकुटीला आलेली असतानाही अशी दरवाढ केली जात असल्याने गरीबांना जगावे कसे असा प्रश्न पडला आहे. आता असे जुलमी सरकार खाली खेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस