शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या विरोधात राष्ट्रवादीने घेतला आक्षेप, पुन्हा जाणार न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 15:04 IST

स्थायी समिती सभापती निवडणुकीला राष्ट्रवादी आणि भाजपाने आक्षेप घेतला आहे. बेकायदेशीर ही निवडणुक प्रक्रिया असल्याचा मुद्दा उपस्थित करीत राष्ट्रवादीने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तौलानीक संख्याबळानुसारच निवड प्रक्रिया करावी असेही त्यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीला पुन्हा लागणार घरघरतौलानिक संख्याबळानुसार निवडणुक घ्यावी

ठाणे - सुमारे दिड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुक लावण्यात आली आहे. परंतु ही निवडणुक प्रक्रियाच बेकायदा आणि चुकीची असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी  कॉंग्रेसने पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तौलानीक संख्याबळानुसारच ही निवडणुक प्रक्रिया पार पडावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तर या निवडणुक प्रक्रियेच्या विरोधात भाजपाने देखील न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्थायी समिती गठीत होण्याच्या प्रक्रियेला अडचणी येणार आहेत.       ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेच्या वेळेस ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील देखील उपस्थित होते. दिड वर्षाच्या प्रर्दीघ प्रतिक्षेनंतर अखेर येत्या १६ मे रोजी ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुक लागली आहे. त्यासाठी ११ मे रोजी अर्ज भरले जाणार आहेत. या निवडणुकीत आता कॉंग्रेसची भुमिका महत्वाची ठरणार असली तरी देखील सभापती हा आमचाच होईल असा दावा शिवसेनेने केला आहे. परंतु या निवडणुक प्रक्रियेवरच राष्टÑवादी कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. स्थायीची सुनावणी न्यायालयात प्रलंबित असून त्याचा अंमित निकाल हा येत्या २५ जून रोजी लागणार आहे. परंतु निकाल येण्यापूर्वीच सत्ताधारी शिवसेनेला याची घाई कशासाठी असा सवालही आव्हाडांनी उपस्थित केला आहे. त्यातही पालकमंत्र्यांनी ही निवडणुक घेण्यासाठी आग्रह केला असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आता पालकमंत्री ठाणे महापालिकेचा कारभार चालविणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. निवडणुक घेतांना विरोधी पक्षाला देखील त्यात सहभागी करुन घेणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता हा केवळ मनमानी आणि चुकीचा कारभार केला जात असल्याचेही ते म्हणाले. कोकण विभागीय आयुक्तांनी जे तौलानीक संख्याबळ दिले आहे. त्यानुसार आधी सदस्यांची निवक करावी मगच सभापतीची निवडणुक घ्यावी असेही त्यांनी सांगितले आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या महासभेत पिठासीन अधिकाऱ्यांनी स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने तौलानीक संख्याबळानुसार पाच नावे दिली होती. परंतु त्यांचे एक नाव कापण्यात आले होते. हाच मुद्दा आता हाताशी घेऊन राष्ट्रवादीने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. एकूणच ही निवड प्रक्रिया चुकीची असून या विरोधात पुन्हा न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.वास्तविक पाहता स्थायी समिती सदस्यांची निवड ही तौलानीक संख्याबळानुसार झालेली नाही. त्याबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. असे असतांना देखील थेट सभापतीपदाची निवडणुक लावणे चुकीचे आहे. त्यामुळे या प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल असा इशारा भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी दिला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाElectionनिवडणूक