शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी; जितेंद्र आव्हाडांची ट्विटच्या माध्यमातून टीका

By अजित मांडके | Updated: June 29, 2023 15:22 IST

शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी, घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी अशा शब्दात त्यांनी टिका केली आहे.

अजित मांडके,  लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे शहरात बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने ठाणे महापालिकेच्या कामांची पोलखोल केली आहे. शहरातील ३८ हून अधिक भागात पाणी साचल्याने ठाणेकरांचा चांगलेच हाल झाले. त्यामुळे नालेसफाईची कामे किती चांगली झाली होती, हे देखील समोर आली आहे. याच मुद्यावरुन राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीव्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी, घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी अशा शब्दात त्यांनी टिका केली आहे.

ठाण्यात बुधवारी तब्बल १४८.५७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यातही शहरातील ३८ हून अधिक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. वृदांवन सोसायटीमधील तब्बल १५० इमारती पाण्याखाली आल्या होत्या. नाल्यातील आणि गटारातील पाणी रस्त्यांवर आल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी अशीच काहीशी परिस्थिती होती. तिकडे दिव्यातही अनेक चाळींमध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले. त्यातही पावसाळा सुरु झाल्यानंतरही शहरातील रस्त्यांची कामे देखील अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान शहरातील नौपाडा, पाचपखाडी, खारकर आळी, कोपरी, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर, दिवा आदी भागात पाणी साचले होते. या भागांमध्ये तुंबलेल्या पाण्याची चित्रफित समाजमाध्यामांवर प्रसारित करत राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांसह पालिका आयुक्तांवर टिका केली आहे. पहिल्या दोन दिवसाच्या पावसातच ठाण्यात पाणी तुंबले आहे. असा प्रकार ठाण्यात कधीच होत नव्हता. विशेष म्हणजे नाले सफाईची पाहणी स्वत: मुख्यमंत्र्यांनी केली होती, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यानंतरही ठाण्यात पाणी तुंबणार, त्याकडे लक्ष द्या,अशी विनंती मी अनेक वेळा ठाणे पालिका आयुक्त यांच्याकडे केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांच्या विशेष सेवेत दंग असणाºया आयुक्तांना याकडे लक्ष देण्यास बहुदा वेळ मिळाला नसावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.  

पाऊस आला याच कौतुक करा..ठाणे तुंबल याची तक्रार काय करता..! अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देतील अशी मला खात्री आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.  शासन आपल्या दारी, आता ठाणेकरांची बारी.. घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी..! अशी टिकाही त्यांनी केली आहे. तर व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी ठाण्यातील विदारक चित्रच दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदे