शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीने करुन दिली शिवसेनेला वचन नाम्याची आठवण, बॅनरवरुन गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 16:01 IST

शिवसेनेने दिलेल्या वचननाम्याची चिरफाड करणारा बॅनर राष्ट्रवादीने ठाण्यात लावला आणि काही क्षणातच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा बॅनर खाली उतरविला. करवाढीच्या मुद्याचा हा बॅनर मात्र ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत होता.

ठळक मुद्दे३४ टक्के करवाढीचा राष्ट्रवादीने केला अनोखा निषेधशिवसेनेने केली ठाणेकरांची फसवणूक

ठाणे - पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचे आश्वासन शिवसेनेने ठाणेकरांना दिले होते. आपल्या वचननाम्यामध्ये तसे लेखी वचनही दिले होते. मात्र, करमाफी तर सोडा थेट १५ टक्के करवाढ करून शिवसेनेने ठाणेकरांची फसवणूक केल्याचा आरोप करीत सेनेला वचननाम्याची आठवण करून देणारा शिवसेनेने केली ठाणेकरांची फसवणूक या मथळ्याखाली आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक फलक ठाणे शहरात लावला. ठाणेकरांची फसवणूक करणाऱ्या शिवसेनेने ठाणेकरांची माफी मागावी, प्रशासनावर वचक नसल्याने सत्ता सोडून द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहे. दरम्यान, काही तासातच सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा फलक काढला.            मागील वर्षी झालेल्या ठरावामध्ये ३४ टक्के करवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी यंदापासून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मागील महासभेत ही करवाढ ३४ टक्क्यांवरून १५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा ठराव रद्द केलेला नसताना तसेच तांत्रिकदृष्ट्या ही करवाढ करणे शक्य नसताना हा ठराव महासभेत मंजुरीसाठी घेण्यात आला, हा महासभेचा अवमान आहे. काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादीने यास विरोध केल्यानंतरही गदारोळात शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात करवाढीचा उल्लेख नसला तरी या प्रस्तावामुळे ठाणेकरांचे कंबरडे मोडले आहे. सन २०१५-१६ मध्ये १० टक्के, २०१६-१७ मध्ये पाच टक्के आणि आता थेट १५ टक्के करवाढ करून शिवसेनेने विश्वास ठेवणाºया ठाणेकरांचा विश्वासघात केला आहे. त्यांनी जे लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते तेच आश्वासन ठामपातील सत्ताधारी विसरले असल्याने आम्हाला होर्डींग्ज लावून त्याची आठवण करून द्यावी लागली, असे परांजपे म्हणाले.          दरम्यान, शिवसेनेने केली ठाणेकरांची फसवणूक या मथळ्याखालील हा होर्डींग्ज शिवसैनिकांनी लागलीच खाली उतरविला. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला महत्वाचे स्थान असते. मात्र, येथे दबावतंत्र वापरून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, जनतेची ही फसवणूक आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही आनंद परांजपे यांनी दिला. 

टॅग्स :thaneठाणेBanerबाणेरNCPराष्ट्रवादी काँग्रेस