शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शाई धरणाला राष्ट्रवादीनेच केला होता विरोध, शिवसेनेचा राष्ट्रवादीवर पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 16:24 IST

शाई धरणाच्या मुद्यावरुन आता राष्ट्रवादी  विरुध्द शिवसेना असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकीकडे राष्ट्रवादीने शाई धरणाचा हट्ट धरला असतांना, दुसरीकडे राष्ट्रवादीनेच या धरणाला विरोध केला होता, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता शाई धरणाला विरोधमहासभेत धरणाचा वाद चिघळणार

ठाणे - पाण्याच्या समस्येवर ठाणे महापालिकेने इतर महत्वाचे प्रकल्प बाजूला ठेवून आधी शाई धरणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी राष्ट्रवादी ने लावून धरली आहे. परंतु त्यांच्या मागणीची हवा शिवसेनेने काढली आहे, एमएमआरडीएने हे धरण बांधावे असा ठराव यापूर्वीच मंजुर झाला आहे. त्यावर तेव्हांचे विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांचीसुध्दा स्वाक्षरी आहे. त्यातही हे धरण होऊ नये यासाठी राष्ट्रवादीच्याच मंडळींनी आंदोलन केले होते, असा आरोप सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या महासभेत शाई धरणाचा वाद चिघळणार हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.              पाण्याच्या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी आणि भविष्याचा विचार करुन ठाण्याला हक्काचा धरण झालेच पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी केली आहे. तसेच बुधवारी होणाऱ्या महासभेत लक्षवेधीच्या माध्यमातून पाण्याच्या समस्येला वाचा फोडण्यात आली असून प्रशासनाने आणि महापौरांनी शाई धरण बांधण्याचा निर्णय जाहीर करावा अन्यथा प्रत्येक महासभेत आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.              राष्ट्रवादीने दिलेल्या या इशाऱ्यानंतर शिवसेनेने सुध्दा आपली बाजू मांडली आहे. शाई धरण होऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी आंदोलने केली होती, कदाचित हे आव्हाडांना माहिती नाही का? असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. त्यातही शाई धरणाचे काम पालिकेला करता येऊ शकत नाही, म्हणून ते धरण एमएमआरडीएने बांधावे असा ठराव सुध्दा तत्कालीन महापौर अशोक वैती यांच्या काळात झाला होता. त्या ठरावावर राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा तत्कालीन विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांची स्वाक्षरी आहे. परंतु आता शाई धरण व्हावे ही मागणी आमदार का करीत आहेत, असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. केवळ प्रसिध्द मिळावी याच हेतूने हे सर्व प्रकार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. धरण व्हावे ही आमची सुध्दा इच्छा आहे. परंतु बांधणे पालिकेला केव्हांच शक्य होणार नाही. त्यामुळे धरण बांधण्याची विनंती शासनाकडे करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी एकत्र आल्यास तशी विनंती शासनाला केल्यास शासन त्या दृष्टीने योग्य ती पावले उचलले अशी आशासुध्दा त्यांनी शेवटी व्यक्त केली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाShiv Senaशिवसेना