बोईसर : भारताचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याचा निषेध करून त्यांच्या सुटके साठी पालघर जिल्हा मनसे तर्फे बोईसरला रैली काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी पाकच्या पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.मनविसे जिल्हाध्यक्ष भावेश चुरी , मनसे माजी जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, मनसे तालुका अध्यक्ष समीर मोरे , उप जिल्हा अध्यक्ष अनंत दळवी, मनविसे उप जिल्हा अध्यक्ष धीरज गावड यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या रॅली च्या सुरवातीला भारताचा तिरंगा झेंडा घेऊन कार्यकर्त्यांनी बोईसर परिसर दणाणून सोडला होता. रॅली मध्ये मनसे, मनसे विद्यार्थी सेना, महिला सेना, कामगार सेना, वाहतूक सेना च्या सर्व कार्यकर्ते आणि आजी माजी पदाधिकारी यांच्या बरोबरच माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. या वेळी चेतन संखे, शिवाजी रेमबाळकर , सुनील राऊत, विशाल जाधव, सागर शिंदे , हेमेन्द्र पाटील, धीरज पाटील, जालीम तडवी, विजय गांगुर्डे, ललितेश संखे, मयंक लाडे, अनिकेत पवार, सचिन कुंभार, तन्मय संखे, अमोल गर्जे, सत्यम मिश्रा,सुनील तांडेल व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते(वार्ताहर )
बोईसरमध्ये नवाज शरिफांचा पुतळा जाळला
By admin | Updated: April 20, 2017 03:52 IST