शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

तुर्फेपाडा तलावाला मिळणार नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:07 IST

बंधाऱ्याचे काम सुरू : पाणीसाठा वाढवण्याचे प्रयत्न

ठाणे : घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड संकुलानजीकच्या तुर्फेपाडा तलावाचा आता कायापालट होणार असून त्यासाठी आता पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यानुसार, येथे गॅबियन पद्धतीचा बंधारा उभारण्याचे काम सुरू असून त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

शहरात आजघडीला ३४ तलाव शिल्लक असून त्यातील मोजके तलाव सोडले, तर इतरांची अवस्था दयनीय झाली आहे. या तलावांच्या अवस्थेबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर, आता कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या तुर्फेपाडा तलावाचा कायापालट करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. यासाठी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी पत्रव्यवहारही केला होता. त्या अनुषंगाने आता या तलावाचे सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.गॅबियन पद्धतीचा बंधारा बांधण्यास सुरुवातसुशोभीकरणाबरोबरच तलावात पाण्याचा मोठा साठा झाल्यास परिसरातील बोअरिंगला बाराही महिने पाणी मिळू शकेल, हे लक्षात घेऊन नगरसेवक डुंबरे यांनी महापालिका प्रशासनाकडे तलावाभोवती गॅबियन पद्धतीचा बंधारा बांधण्याची मागणी केली होती. त्याला आता यश आले असून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बंधाऱ्यांच्या कामाला मंजुरी दिली होती. त्यानुसार, आता बंधाºयाचे काम सुरू झाले आहे. या बंधाºयामुळे यंदाच्या पावसाळ्यात तुर्फेपाडा परिसरात पाण्याचा मोठा साठा उपलब्ध होईल, अशी माहिती पालिकेने दिली.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी