शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील मराठा मोर्चा आंदोलनप्रकरणी नौपाडा पोलिसांनीही केली २५ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 21:16 IST

मराठा मोर्चा आंदोलनाच्या वेळी अचानक नियंत्रणाबाहेर गेलेल्या आंदोलकांनी तीन पोलसी वाहनांसह ३० वाहनांवर दगडफेक केली. या दगडफेकीत सात पोलीस कर्मचारीही जखमी झाले. या दंगलीप्रककरणी वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केलेल्या २५ जणांना आता नौपाडा पोलिसांनीही न्यायालयातून अटक केली आहे.

ठळक मुद्देठाण्यात ठोक मोर्चाच्या वेळी झाली होती धुमश्चक्रीवागळ इस्टेट पोलिसांनी केली होती अटक१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

ठाणे : ठाण्यात झालेल्या मराठा मोर्चा आंदोलनाच्या वेळी पोलिसांवरील हल्ल्यासह दगडफेक केल्याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केलेल्या दारा चौहान याच्यासह २५ जणांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्यांची शुक्रवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.नितीन कंपनी येथे २५ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको केल्यानंतर अचानक हिंसक झालेल्या जमावाने वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम वाघ, उपनिरीक्षक तायडे, हवालदार सुनील शेलार आणि मिलिंद जोशी यांच्यावर दगडफेक केली होती. यात हे चौघेही जखमी झाले, तर काहींनी सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड आणि वरिष्ठ निरीक्षक अफजल पठाण यांच्याही सरकारी वाहनावर दगडफेक केली. याप्रकरणी सुमारे ३०० ते ३५० जणांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून त्यांच्यापैकी दारा विक्रमादित्य चौहान, अंगत लालचंद चौहान, तेजस रेणोसे, सुनील पाटील, शिवाजी कदम, निखिल, अक्षय आंबेरकर, दीपेश बनके, राहुल चौहान, रमण लाड, राजेश बागवे, विश्वास चव्हाण आणि किरण मोरे आदी २५ जणांना वागळे इस्टेट पोलिसांनी २६ जुलै रोजी अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. दरम्यान, नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नितीन कंपनीच्या परिसरातही याच आंदोलकांनी धुमाकूळ घातल्याचे तपासात उघड झाले. सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्यासह तीन अधिकारी आंदोलकांच्या दगडफेकीत जखमी झाले होते. पोलिसांच्या वाहनांसह १५ ते २० वाहनांवर दगडफेक झाली होती. पोलिसांनी त्यांना या गुन्ह्यातही अटक करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. त्यानुसार, त्यांना ३० जुलै रोजी ठाणे न्यायालयातून पुन्हा अटक करण्यात आली. न्यायालयाने या सर्व २५ आरोपींना ३१ जुलै रोजी न्यायालयीन कोठडी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेMorchaमोर्चाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा