शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्याला निसर्ग चक्री वादळाचा चकवा: सकंट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 23:56 IST

ठाणे जिल्हयात निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारी धडकल्यानंतर पावसानेही काही प्रमाणात हजेरी लावली. नवी मुंबईपासून सुरुवात झालेल्या या वादळाने जिल्हाभर दोन ते तीन तासांची हजेरी लावली. या काळात ठाणे शहरासह भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी भागांमध्ये ७० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली. तर १० ते १२ घरांचे नुकसान झाले. या वादळापासून बचाव होण्यासाठी खाडी तसेच नदीकिनारी असलेल्या तीन हजार लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले होते.

ठळक मुद्देजिल्हयातून तीन हजार ९० लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर ७० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली १० ते १२ घरांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकले असतांना पावसानेही जिल्हाभर हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे शहापूर, भिवंडी, मुरबाड येथील १० ते १२ घरांचे नुकसान झाले. तर ठाणे शहरासह जिल्हयात ७० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या वादळामुळे कोणतीही मोठी हानी झाली नसून जिल्हयावरचे संकट टळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.दुपारी ३ ते ५ वाजण्याच्या सुमारास या निसर्ग वादळाची नवी मुंबईतून सुरुवात झाली. नंतर कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यापासून सर्वच ठिकाणी थोडया फार प्रमाणात त्याचा आसर जाणवला. वादळी वाºयामुळं नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, शहापूर आणि अंबरनाथ या भागांमध्ये अनेक झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. पावसाचा जोर जास्त नसला तरी वाºयामुळे समुद्रकिनारी असलेल्या घरांचे पत्रे उडाल्याच्याही घटना घडल्या. कुळगाव बदलापूरात १४ ठिकाणी, अंबरनाथमध्ये १५, उल्हासनगरमध्ये १० तर भिवंडीत सहा झाडे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. कल्याणमध्ये चिराग हॉटेल भागात पाणी भरले होते. ठाण्यातील कळवा भागातही नवशक्तीचाळीत पाणी साचले होते. शहापूरातील दरहिगाव, मुरबाडमधील सोनावडे आणि वालीवडे तसेच भिवंडीतील एका घराचेही नुकसान झाले.* खबरदारीची उपाययोजना म्हणून ठाणे जिल्हयातील ४३० ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सर्व ग्रामविस्तार अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती. बुधवारी दिवसभर शहर तसेच ग्रामीण भागात दवंडी पिटवून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. ठाणे महापालिकेनेही एनडीआरफची एक टीम तैनात ठेवली होती.* शिवाय, खाडी किनारी असलेल्या मीरा भार्इंदरच्या एक हजार ७००, शहापूरच्या एक हजार ६७ अशा तीन हजार ९० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. सुदैवाने या वादळामुळं कोणतीही मोठी हानी झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.* निसर्ग चक्र ीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे जिल्हा आपत्कालीन कक्ष, तसेच ठाणे महानगरपालिका आपत्कालीन कक्ष येथे भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वादळामुळे प्रभावित झालेल्या ठिकठिकाणच्या परिस्थितीची शिंदे यांनी माहिती घेतली. स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी देखील त्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. वादळाचा प्रभाव ओसरत असून ठाणे जिल्हावासीयांनी घाबरण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.* जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय  आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तीन तर राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तीन अशी सहा पथके जिल्हयातील मीरा भार्इंदर, शहापूर आणि नवी मुंबईत तैनात केली होती.

टॅग्स :thaneठाणेcycloneचक्रीवादळ