शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कळव्यातील शिवसेना नगरसेवकावर कारवाईसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 20:03 IST

पत्नीला मारहाण केल्याचा आरोप असलेले सेनेचे नगरसेवक गणेश कांबळे यांच्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आघाडी उघडली आहे. या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन कांबळे यांच्यावर गंभीर आरोप केले.

ठळक मुद्देचित्रा वाघ यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेटगणेश कांबळेंवर गंभीर आरोपतडिपार करण्याची मागणी

ठाणे : पत्नीला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या शिवसेना नगरसेवक गणेश कांबळे यांच्याविरूद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरूवारी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी कारवाई करण्याचे आदेश कळवा पोलिसांना दिल्याची माहिती वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत गणेश कांबळे हे कळवा परिसरात शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. ते कळव्यातील महात्मा फुले नगर परिसरात राहतात. गत दोन वर्षांपासून गणेश कांबळे हे घरगुती कारणांवरून आपल्याला मारहाण करीत असल्याची तक्रार त्यांची पत्नी कॅरलिन यांनी कळवा पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि विवाह प्रमाणपत्राची मागणी केली. यासंदर्भात चित्रा वाघ यांनी बुधवारी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा करिना दयालानी, अ‍ॅड. वंदना जाधव आणि कॅरलिन कांबळे आदी उपस्थित होते.सरकारी जमिनी हडप करून, त्यावर बेकायदेशीर बांधकामे गणेश कांबळे यांनी केली असल्याचा आरोप वाघ यांनी यावेळी केला. त्याविषयीचे पुरावे पोलीस आयुक्तांना दिले असून, गुन्हेगारी पार्श्वभूमि पाहता कांबळे यांना तडिपार करण्याची मागणी केली असल्याचे वाघ यांनी सांगितले. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे असून, एका गुन्ह्यात कॅरलिना हिनेच त्यांचा जामीन घेतला आहे. आपल्या गैरकृत्यांची माहिती कॅरलिनाला असल्यामुळे तो तिला मारझोड करायचा असा आरोप आरोप वाघ यांनी केला. यासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.दरम्यान, राज्य राखीव दलाचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केलेल्या महिला पोलिसांच्या छळाबाबतही आपण पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांचे समुपदेशन करावे, अशी मागणी आपण केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात गणेश कांबळे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ते एका बैठकीमध्ये व्यस्त असल्याची माहिती त्यांच्या सहकार्‍याने दिली.महिला आयोग आणि गृहखात्यावर टीकामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असून, रणजित पाटील आणि दीपक केसरकर असे दोन गृहराज्यमंत्री आहेत. राज्यात महिला अत्याचाराचे गुन्हे घडत असताना गृह विभाग दखल घेताना दिसत नाही. मुंबईला खेटून असलेल्या ठाण्यातील या प्रकरणामध्येही तेच पाहायला मिळत असल्याची टीका चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामांची माहिती देण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना अशा प्रकरणाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याने राज्यात महिला आयोग अस्तित्वात आहे का, असा बोचरा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :thaneठाणेChitra Waghचित्रा वाघPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस