शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील पोलिस गणवेश वाटप वादाच्या भोवऱ्यात; NCP च्या आनंद परांजपेंची उपरोधिक टीका

By जितेंद्र कालेकर | Updated: February 6, 2023 21:15 IST

सर्वच लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम व्हावेत

ठाणे : खासदारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नौपाडा पोलिसांना केलेले गणवेश वाटप वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या प्रकारावर उपरोधक टिका करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी गृहमंत्र्यांनाच विनंती करत राज्यभरातील सर्वच आमदार, खासदारांच्या वाढदिवसानिमित्त असे  उपक्रम राबविण्याचा सल्ला दिला आहे.  त्यामुळे गृहखात्याच्या निधीची बचतच होईल, असेही त्यांनी सुनावले आहे. 

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नौपाडा पोलिस ठाण्यात गणवेशाचे वाटप केले होते. वास्तविक गणवेश पुरवण्याची जबाबदारी राज्याच्या गृहखात्याची असून त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद असते. इतकेच नव्हे तर गणवेश धुलाईचा भत्ताही पोलिसांना दिला जातो. असे असतांनाही पोलिसांना राजकीय गणवेश चढविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा दोन दिवसांपासून ठाण्याच्या वतुर्ळात सुरू होती. या उपक्रमाला पोलिस उपायुक्तही उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. अखेर या सर्व प्रकाराचा समाचार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष परांजपे यांनी घेतला आहे.

हा चांगला उपक्रम आहे, महाराष्ट्राचे पोलिस संचालक रजनीश सेठ यांनी एक परिपत्रक काढावे, की महाराष्ट्रातील सर्वच पोलिसा ठाण्यांमध्ये हा उपक्रम राबवावा. अशा उपक्रमांमध्ये डीसीपींनी उपस्थित रहावे, केक कापावा, त्या लोकप्रतिनिधीला भरवावा आणि महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश वाटप त्या लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसानिमित्त व्हावा, असे  परांजपे यांनी उपरोधक टीका केली आहे. अशी मुभा सर्वच राजकीय पक्षांना दिली जावी असेही ते म्हणाले. अशा प्रकारचे कार्यक्रम केल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर, विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, त्याचे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

खासदारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजकांनी गणवेशाच्या साहित्याचे वाटप केले. गेल्या वर्षी वाहतूक पोलिसांना अशा साहित्याचे वाटप केले होते. नौपाडा पोलिस ठाण्याला भेट देण्यासाठी गेलो, त्यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होतो - गणेश गावडे, पोलिस उपायुक्त, ठाणे शहर

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदे