शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस : जिल्हाध्यक्षपदासाठी मोजकेच इच्छुक,निवडीवरून नेत्यांपुढे पेच कायम, सक्षम नेतृत्वाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 03:03 IST

मीरा-भार्इंदरमध्ये सत्तेचा पाळणा अनेक वर्षे हलवणाºया राष्ट्रवादी काँग्रेसचा पालिका निवडणुकीत जबरदस्त पराभव झाला. बंडखोरीमुळे आधीच खिळखिळी झालेल्या राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्षपदासाठी सक्षम नेतृत्व मिळेनासे झाले आहे.

मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये सत्तेचा पाळणा अनेक वर्षे हलवणाºया राष्ट्रवादी काँग्रेसचा पालिका निवडणुकीत जबरदस्त पराभव झाला. बंडखोरीमुळे आधीच खिळखिळी झालेल्या राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्षपदासाठी सक्षम नेतृत्व मिळेनासे झाले आहे. त्यातही जे मोजकेच इच्छुक असले, तरी कुणाला निवडायचे, यावरून खडाजंगी सुरू आहे.पालिका स्थापन झाल्यापासून १५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ महापौर झाले. शिवाय खासदार, आमदारसुद्धा निवडून आले. २०१२ मध्ये पालिकेत पक्षाचे २८ नगरसेवक निवडून आले होते. पण, शहरात राष्ट्रवादी म्हणजे गिल्बर्ट मेन्डोंसा असे समीकरण होते. माजी मंत्री गणेश नाईक गट व मेन्डोंसा गटामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांची नेहमीच कोंडी झाली. त्यातही मेन्डोंसा गट वरचढ होता.मेन्डोंसा जमीन खरेदीप्रकरणी जेलमध्ये गेले. त्या पडत्या काळात स्थानिक राष्ट्रवादी नगरसेवक, कार्यकर्ते यांना नाईक कुटुंबानेदेखील वाºयावर सोडले. त्यामुळे एकीकडे पक्षातून कुणी वाली नाही आणि दुसरीकडे शहरात भाजपा आमदार नरेंद्र मेहता व शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची चलती असल्याने त्यांनी राष्ट्रवादीला भगदाड पाडले.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मेन्डोंसा सर्वच्या सर्व नगरसेवक तसेच आजीमाजी जिल्हाध्यक्षांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपा, सेना वा काँग्रेसमध्ये गेले. ज्येष्ठ नगरसेवक आसीफ शेख ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी सोडून भाजपात गेले.निवडणूक तर लढवायची म्हणून लढवली गेली. ६६ उमेदवार उभे केले, पण बहुतांश उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. इतकी वर्षे पक्ष शहरात सत्तेत असल्याने पक्षाची मते मिळतील, हा अंदाजसुद्धा धुळीस मिळाला.निवडणुकीत नामुश्की ओढवल्यावर आता जिल्हाध्यक्षपदी कुणाला निवडायचे, अशी चिंता राष्ट्रवादीत पडली आहे. पडत्या काळातदेखील संतोष पेंडुरकर, संतोष गोळे, साजीद पटेल पक्षासोबत राहिले. तर, नाईक यांचे कट्टर समर्थक व माजी नगरसेवक प्रकाश दुबोले निवडणुकीत काँग्रेसमध्ये गेले खरे. पण, उमेदवारी मिळूनही तेथे पॅनलमध्ये बिनसल्याने ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतले. त्याशिवाय, निवडणुकीत काँग्रेसमध्ये गेलेले सुरेश पांढरे आले.

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी