शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय वीरबाला बरफ जगतेय हलाखीचे जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:06 IST

घनदाट जंगलात बिबट्याच्या जबड्यातून मोठ्या बहिणीची सुटका करणाऱ्या हाली बरफला २०१३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘राष्ट्रीय वीरबाला शौर्य’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.

- सुरेश लोखंडेठाणे : घनदाट जंगलात बिबट्याच्या जबड्यातून मोठ्या बहिणीची सुटका करणाऱ्या हाली बरफला २०१३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘राष्ट्रीय वीरबाला शौर्य’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. शालेय अभ्यासक्रमात ‘धाडसी हाली’ हा पाठ देऊन देशातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श असलेली हाली सध्या हलाखीचे जीवन जगत आहे. प्रशासनाच्या निष्काळजीमुळे ती शिधापत्रिकेपासून होती. हालीला दोन महिन्यांपूर्वी शिधापत्रिका मिळाली असून, रेशनिंगच्या अन्नधान्यावर तिची गुजराण सुरू आहे.शहापूर तालुक्यातील रातआंधळे येथे हाली आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. झोपडीत राहणारी हाली अतिशय कष्टी व हलाखीत जगत असल्याचे वास्तव उघड करून लोकमतसह आदिवासींसाठी कार्य करणाºया श्रमजीवी संघटनेने प्रशासनाचे लक्ष केंद्रीत केले. आता तिच्या घरकुलाचे काम नुकतेच सुरू केले आहे. शहापूर येथील मुलींच्या वसतिगृहात झाडलोटचे काम ती ‘कामाठी’ म्हणून रोजंदारीने करीत आहे. प्रशासनाच्या लहगर्जीमुळे हलाखीचे जीवन जगणारी ही राष्टÑीय वीरबाला सध्या तीन मुलांची आई आहे. राष्टÑाने सन्मानित केल्यानंतर तिच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली असती तर त्यांना शिक्षण घेता आले असते. उच्च शिक्षणही घेता आले असते. लहानपणी लग्न झाले नसते, अशी खंत हालीकडून व्यक्त करण्यात येत आहे.हालीला दोन मुली आणि एका मुलगा आहे. सहा वर्षांची मोठी मुलगी असलेली हाली रातआंधळे येथे पती राम कुवरे याच्यासह राहते. इयत्ता ४ थीच्या वर्गासाठी मराठीच्या पुस्तकात दहाव्या क्रमांकावर ‘धाडसी हाली’ हा धडा शिकणारे विद्यार्थी हालीला आदर्श मानत आहेत. तानसा अभयारण्यात आदिवासींचे १२ पाडे आहेत. नांदगावजवळील जमनापाडा येथे असताना मोठ्या बहिणीसोबत ती लाकडं आणण्यासाठी जंगलात गेलीहोती. यादरम्यान मोठ्या बहिणीवर झडप घालून बिबट्याने तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. जवळ असलेल्या हालीने प्रसंगावधान राखून बिबट्यावर दगडांचा वर्षाव केला. त्यामुळे भेदरलेल्या बिबट्याने तिच्या बहिणीला सोडून पळ काढला. २०१२ साली ही घटना घडली. बहिणीला वाचवताना बिबट्यालाही जिवंत ठेवल्यामुळे हाली २०१३ मध्ये राष्टÑीय वीरबाला शौर्य पुरस्काराची मानकरी ठरली होती.