शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
3
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
4
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
5
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
6
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
7
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
8
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
9
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
10
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
11
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
12
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
13
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
14
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
15
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
16
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
17
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
18
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
19
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
20
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...

पवईत १५० फूट उंचीवर राष्ट्रध्वज, नागरीवस्तीतील पहिलाच उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 2:13 AM

राष्ट्रध्वजाविषयी जनजागृती करण्यासाठी गुरुवारी स्वातंत्र्यदिनी मुंबईतील पवई येथे १५० फूट उंचीवर तिरंगा फडकावण्यात येणार आहे.

- जान्हवी मोर्येडोंबिवली : राष्ट्रध्वजाविषयी जनजागृती करण्यासाठी गुरुवारी स्वातंत्र्यदिनी मुंबईतील पवई येथे १५० फूट उंचीवर तिरंगा फडकावण्यात येणार आहे. ६० बाय ४० फुटांचा हा राष्ट्रध्वज दोन इमारतींच्या मध्यभागी फडकणार आहे. नागरीवस्तीत अशाप्रकारे प्रथमच घडणार असल्याचा दावा आयोजक राजेश बक्षी यांनी केला आहे.बक्षी हे पूर्वी अंबरनाथमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अंबरनाथ येथेच झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एमएससी केली. २००६ मध्ये ते पवई येथे राहायला गेले. बदलापूर येथे त्यांची औषधनिर्मिती कंपनी आहे. २०१५ मध्ये ते तुर्कस्तानमध्ये इस्तंबूलला गेले होते. तेथे अनेक ठिकाणी त्यांनी राष्टÑध्वज फडकत असल्याचे पाहिले. तेव्हा आपला राष्टÑध्वजही भारतात सर्व ठिकाणी असावा, असे मनात आले. त्यानंतर त्यांनी राष्टÑध्वजाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली. त्यांनी बी. के. फ्लॅग फाउंडेशनची स्थापना केली. बक्षी यांचे वडील भारतीय सैन्यात असल्याने राष्ट्रप्रेम त्यांच्या अंगी भिनले होते. त्यामुळे राष्ट्रासाठी काहीतरी करावे असे सतत त्यांच्या मनात येत होते. त्यातूनच त्यांनी जनजागृतीचे काम हाती घेतले.सर्वप्रथम त्यांनी अंबरनाथ येथे हुतात्मा चौकात १०० फूट उंचीवर ध्वज फडकवला. त्यानंतर राजभवन येथे १५० फुटांवर, मुंबई विद्यापीठात १०० फूट उंचीवर राष्ट्रध्वज लावला आहे. ठाण्यात माजीवाडा, सीएसटीला हजहाउस येथेही राष्ट्रध्वज फडकावला आहे. हजहाउस ही इमारत २० मजली असून ६० फूट उंचीवर ध्वज लावणारी ही देशातील सर्वात उंच इमारत ठरली आहे.राष्ट्रध्वज फाटल्यास तो लगेच बदलावा, १०० फुटांच्या वर राष्ट्रध्वज संपूर्ण वर्षभर ठेवू शकतो. राष्ट्रध्वज कधी काढावा, फाटलेला राष्ट्रध्वजांचे काय करावे याबाबत बक्षी जनजागृती करीत असतात. अनेक जण फोन करून त्यांचे मार्गदर्शन घेतात. अनेक संस्था, शाळा आणि महाविद्यालयातून ते मार्गदर्शन करतात.गेटवेलाही फडकणारसर्वोच्च न्यायालयाने २००२ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार सोसायटी, घर, कार्यालय येथेही राष्ट्रध्वज लावू शकतो, असे बक्षी यांनी सांगितले. प्रत्येक गल्लीबोळात राष्ट्रध्वज फडकावा आणि प्रत्येक भारतीयांनी त्याला सलाम करावा, हाच बक्षी यांचा ध्यास आहे. लहान मुलांनाही राष्ट्रध्वजाविषयी माहिती असावी असे ते म्हणाले. लवकरच गेट वे आॅफ इंडिया येथेही राष्ट्रध्वज फडकवणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन