शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बालशौर्य पुरस्कार विजेती वीरबाला हाली बरफ हलाखीत; रेशनिंगच्या अन्नधान्यापासूनही वंचित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 19:29 IST

Hali Baraf : तानसाच्या अभयारण्यात स्वत:सह बहिणीला बिबटय़ाच्या तावडीतून सोडवणाऱ्या या हाली बरफला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानीत केलं आहे.

सुरेश लोखंडे

ठाणे - बिबटय़ाच्या तोंडातून स्वत: सह बहिणीची सुटका करणारी हाली बरफ ही आदिवासी कन्या आठ वर्षापूवी केंद्र शासनाचा बाल शौर्य पुरस्कार विजेती आहे. आता ही हाली बरफ तीन बालकांची आई आहे. शहापूर तालुक्यातील रातांधळे येथे पतीसोबत आहे. मात्र सध्या ती फार हलाखीचे जीवन जगत आहे. शासनाच्या शिधावाटप दुकानावरील अन्नधान्यही तिला चार महिन्यांपासून मिळालेलं नाही. गावातील लाकडं फोडून ती कसाबसा परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे.

तानसाच्या अभयारण्यात स्वत:सह बहिणीला बिबटय़ाच्या तावडीतून सोडवणाऱ्या या हाली बरफला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानीत केलं आहे. स्वयंपाकासाठी सरपन आणण्यासाठी बहिणीसह ती जंगलात गेली होती. झुडपात दबाधरून बसलेल्या बिबटय़ाने तिच्या बहिणीला उचलून नेण्याचा प्रयत्न केला होता. पण क्षणाचाही विलंब न लावता हालीने दगडांचा मारा करून बिबटय़ाच्या तावडीतून बहिणीची सुटका करून जीव वाचवला होता. त्याची दखल घेऊन केंद्र शासनाने 2013 दरम्यान तिला बाल शौर्य पुरस्कारा देऊन सन्मानित केलेले आहे. पण आता तीन फार हालाखीचे जीवन जगत आहे.

बालकांसाठी आदर्श ठरलेली ही वीरबाला हाली बलफ सध्या तीन बालकांची आई आहे. आता ती हाली राम कुवर या नावाने ओळखली जात आहे. काही काळ तर तिला रेशनिंगकार्ड मिळालेले नव्हते. लोकमतसह श्रमजीव संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते प्रकाश खोडका यांनी तिची प्रशासनाकडे कैफियत मांडून, पाठपुरावा करून तिला अंत्योदय कार्ड प्राप्त करून दिले आहे. पण गेल्या चार महिन्यापासून त्यांवर अन्नधान्यही मिळालेले नसल्याचे वास्तव खोडका, यांनी प्रशासनाकडे मांडलेले आहे. 

एवढेच नव्हे तर शहापूर येथील आदिवासी विभागाच्या मुलींच्या वसतीगृहात रोजंदारीने काम करणाऱ्या हालीचा तो रोजगारही गेलेला आहे. कोरोनामुळे आश्रम शाळा, वसतीगृहच बंद असल्यामुळे तिचा रोजगार गेलेला आहे. गावातही फारसा कामधंदा नाही. गावकऱ्यांचे लाकडं फोडणाऱ्या पतीला ती आपल्या परीने मदत करीत आहे. जंगलातून लाकडांची मोळी आणून ती गावात देऊन त्यावर मिळणाऱ्या मोबदल्यावर सध्या ती तीन मुलांसह पतीचा उदरनिर्वाह करीत आहे. वेळप्रसंगी या परिवारास अर्धपोटी राहण्याचा प्रसंग ओढावलेला असल्याचे खोडका यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :thaneठाणे