शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

अरुंद रस्ते, पार्किंग व्यवस्थेची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 01:39 IST

उल्हासनगरचा म्हणावा तसा विकास झालेला नाही.

तब्बल नऊ लाख लोकसंख्या व ७० हजारांपेक्षा जास्त वाहने असलेल्या उल्हासनगरात सिग्नल व्यवस्था, झेब्रा क्रॉसिंग आणि विशेष म्हणजे वाहनतळाची सुविधाच नाही. अरुंद रस्ते व वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूककोंडीचे ग्रहण या शहराला लागले आहे. त्यातून ध्वनी व वायुप्रदूषणात वाढ झाल्याची टीका सर्वस्तरांतून होत आहे. मात्र, वाहतूक पोलीस व महापालिका त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात अपयशी ठरली आहे.

उल्हासनगरचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. शहरातील वाहतूक व्यवस्था व नियत्रंणाचे काम उल्हासनगर व विठ्ठलवाडी येथील दोन वाहतूक विभाग आणि पालिकेने दिलेल्या ४५ वॉर्डनमार्फत होते. मात्र, अरुंद रस्ते व कोंडीमुळे वाहनांचा वेग १५ पेक्षा जास्त नसतो.दुसरीकडे शिवाजी चौक, १७ सेक्शन, फॉरवर्ड चौक, नेहरू चौक, गोल मैदान, जपानी मार्केट, शिरू चौक, बिर्ला मंदिर परिसर, खेमानी, पवई चौक, व्हिनस चौक, कॅम्प नं-४ व ५ चे मुख्य मार्केट येथे खरेदीसाठी येणाऱ्यांच्या वाहनांची संख्याही अधिक असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात कोंडी होते.

महापालिकेने स्वत:ची पार्किंग व्यवस्था विकसित केलेली नाही. त्यामुळे वाहनचालकांना खाजगी पार्किंगमध्ये जादा पैैसे देऊन वाहनांचे पार्किंग करावे लागत आहे. शहरातील बहुतांश रस्ते अरुंद आहेत. कल्याण ते बदलापूर रस्त्याचे काम चार वर्षांपासून ठप्प आहे. तसेच रस्त्याची दुरवस्था असल्याने रस्ते अपघातांची संख्या मोठी आहे. अनेक जणांचे अपघातांत जीव गेले आहेत.

रस्त्याच्या नियमांचे उल्लंघन शहरात सर्रास झाले असून, जागोजागी मनात वाटेल तेथे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मध्यंतरी, न्यायालयाने अवैध गतिरोधक काढून टाकण्याचे आदेश दिल्यावर महापालिकेने अनावश्यक गतिरोधक काढून टाकले. मात्र, आता पुन्हा वाहतूक विभागाच्या परवानगीविना वाटेल तेथे महापालिका अधिकारी व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ठेकेदाराने काही फुटांच्या अंतरावर गतिरोधक उभारले आहेत.

शहरभर दिशादर्शक नामफलक: महापालिकेने जाहिरातींचा ठेका देताना जाहिरातीच्या फलकाच्या एका बाजूला शहरातील चौक, रस्ते, मंदिर, महत्त्वाची ठिकाणे, मार्केट आदींचे नाव लिहिण्याची अट टाकली आहे. त्यानुसार, शहरातील बहुतांश भागात दिशादर्शक नामफलक असून, त्याचा फायदा शहरवासीयांना व शहरात येणाºया अनोळखी नागरिक व वाहनचालकांना झाला आहे. तसेच वाहतूक पोलिसांच्या मदतीला महापालिकेने ४५ वॉर्डन दिले असून, त्यात वाढ करण्याचे संकेत नगरसेवकांनी दिले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र