शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधा-यांचा नाकर्तेपणा : दिव्यात भाजपाचे अनोखो श्राद्ध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 19:49 IST

ठाणे : दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणा-या दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तथा दिवा प्रभाग समितीचे अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या खाजगी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरच भाजपा ने श्राद्ध घालून अनोखो आंदोलन केले. याप्रसंगी भाजपाचे दिवा सरचिटणीस रोहिदास ...

ठळक मुद्देविकासकामांतील चालढकलीविरोधात कार्यकर्त्यांनी केले मुंडणमे महिन्याच्या आत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

ठाणे : दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणा-या दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तथा दिवा प्रभाग समितीचे अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या खाजगी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरच भाजपाने श्राद्ध घालून अनोखो आंदोलन केले. याप्रसंगी भाजपाचे दिवा सरचिटणीस रोहिदास मुंडे, अंकुश मढवी, नरेश कदम यांनी मुंडण केले.मुंब्रादेवी कॉलनी रोडसाठी सुमारे ९ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या रस्त्याचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू झाले आहे. तीन महिने होऊनही १० टक्के काम झालेले नाही. निधी मंजूर आहे, वर्क आॅर्डर मिळाली आहे, तरी कामात वेळ काढला जात असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच, अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना सत्ताधारी शिवसेना मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत मुंब्रादेवी कॉलनी येथे रस्त्याचे काम ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सुरू आहे, त्याच्या निषेधार्थ गुरुवारी भाजपा कार्यकर्त्यांनी ठामपा सत्ताधारी व प्रशासनाच्या नावाने श्राद्ध घालत मुंडण केले. याप्रसंगी कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड, अ‍ॅड. आदेश भगत, निलेश पाटील, रोशन भगत, सचिन भोईर, गणेश भगत आदी उपस्थित होते.दिवा शहरात सत्ताधा-यांची मनमानी असून नागरिकांचे हित लक्षात न घेता केवळ टेंडरसाठी कामे केली जात असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. गणेशनगर भागातील खड्डे अद्याप भरण्यात आले नाहीत, या रस्त्याच्या कामाला सुरु वात कधी करणार, असा सवाल उपस्थित करून सत्ताधारी दिव्यातील नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला.मे महिन्याच्या आत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे कल्याण ग्रामीणचे नेते शिवाजी आव्हाड यांनी दिला आहे. दिव्यातील सर्व मुख्य रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी करा, अशी मागणी अ‍ॅड. आदेश भगत यांनी केली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेPoliticsराजकारण