शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी - नरेश म्हस्के

By अजित मांडके | Updated: February 22, 2024 17:47 IST

मराठा आरक्षणाचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्यानंतर सभागृह बाहेर सर्वच विरोधक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा समाचार घेण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हस्के यांनी आरोप केला.

ठाणे : जर तुमचा या गोष्टीवर विश्वास नव्हता, तर सभागृहात तुम्ही विरोध का नाही केला. तसेच सभागृहात एक आणि सभागृहाबाहेर दुसरी भूमिका घ्यायची हे दुटप्पी धोरण महाविकास आघाडीचे असल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. तर, दोन दगडावर पाय ठेवणारी ही मंडळी आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. मराठा आरक्षणाचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्यानंतर सभागृह बाहेर सर्वच विरोधक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा समाचार घेण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हस्के यांनी आरोप केला.

मराठा आरक्षणावर महाविकास आघाडी दुटप्पी भूमिका घेत आहे. मराठा आरक्षणाबाबत वेगळा काही मार्ग असेल तर तो सांगावा केवळ सल्ले देण्याचे काम करू नये. ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण द्यावी की देऊ नये हे जाहीर करावे. उगाच गोल गोल फिरून बोलू नका, येत्या दोन-तीन दिवसात राज्यपाल त्या काढलेल्या आदेशावर स्वाक्षरी करतील असेही म्हस्के यांनी यावेळी सांगितले.  मराठा आरक्षणा बाबत घेतलेला निर्णय चुकीचा असेल तर शरद पवार यांनी मार्गदर्शन करावे तुम्ही कित्येक वर्ष महाराष्ट्रात सत्तेत होता, आपण मराठा आरक्षणासाठी काय केले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केले असा सवाल उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात म्हणजेच २०१८ मध्ये हे आरक्षण हायकोर्टात टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही याचे प्रमुख कारण म्हणजे त्या वेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळेवर वकील दिला नाही. त्यामुळे मराठ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार उद्धव ठाकरे हेच असल्याचेही म्हस्के यांनी म्हटले आहे.

दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतल्यानंतर चार महिन्यात सर्वेक्षण केले, पूर्ण अभ्यास केला, वकील आणि तज्ञांचा सल्ला घेतला. असेही म्हस्के म्हणाले. आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा नैतिक अधिकार शरद पवारांना नाही, आपण काय केले याचे आत्मपरीक्षण करावे असेही म्हस्के यावेळी म्हणाले. हे आरक्षण टिकणार असल्याचा दावा करताना ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने दाखवून दिल्या होत्या, त्या सर्व त्रुटी दूर करण्याचे काम शिंदे आणि त्यांच्या सरकार ने केलेले आहे.

टॅग्स :thaneठाणे